मंत्रिमंडळ

कानपूरमधे नागरी सार्वजनिक वाहतूक दळणवळणाला चालना


कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 28 FEB 2019 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

दोन कॉरीडॉरच्या आणि कानपूरची महत्वाची सार्वजनिक सुविधा सेवा आणि शहराचा महत्वाचा समूह असलेला भाग जोडणाऱ्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे. 

वैशिष्ट्ये -
आयटीटी ते नौबस्ता दरम्यानचा 23.785 किलोमीटरचा हा मार्ग काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भूमिगत राहणार असून या मार्गावर 22 स्थानके राहतील.
हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी 11,076.48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दळणवळण विषयक वैशिष्ट्ये -
आयजेटी कानपूर ते नौबस्ता कॉरीडॉर, अनेक शैक्षणिक संस्था, रेल्वे आणि बस स्थानक, आयआयटी कानपूर यांचा समावेश असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. यामुळे वाणिज्यिक वेळामध्ये सुमारे 40 लाख लोकांना याचा लाभ होणार आहे.

प्रकल्प तपशील -
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार समान समभाग तर काही भाग बहुविध आंतरराष्ट्रीय वित्तीय निधीकडून सॉफ्ट लोन म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2019-20 या वित्तीय वर्षासाठी या प्रकल्पाला उत्तर प्रदेश सरकारने आधीच 175 कोटीची तरतूद केली आहे.

प्रभाव 
या प्रकल्पामुळे शहराला माफक दरात, विश्वासार्ह, सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यातून अपघातांचे प्रमाण कमी होण्या बरोबरच प्रदूषण, प्रवासाचा वेळ, उर्जा वापर कमी होणार आहे. 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane
 
 



(Release ID: 1567186) Visitor Counter : 71


Read this release in: English