आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
सतलज जल विकास निगम कडून अरुण 3 जल विद्युत प्रकल्प (नेपाळ भाग )पारेषण घटकासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंत्री मंडळाची मान्यता
Posted On:
28 FEB 2019 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीने, अरुण 3 जल विद्युत प्रकल्प (नेपाळ भाग )पारेषण घटकासाठी जून 2017 च्या मूल्य स्तरावर 1236.13 कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.नेपाळ मधल्या अरुण 3 एचईपीमधून वीज आणण्यासाठी ही 217 किलोमीटरची पारेषण वाहिनी आहे.
योजनेच्या पारेषण घटक निर्मितीतून सुमारे 400 जणाना रोजगार प्राप्त होईल.
प्रभाव-
या प्रकल्पातून भारताला अतिरिक्त वीज मिळणार आहे त्याचबरोबर भारताचे नेपाळबरोबरचे आर्थिक संबंधही दृढ होणार आहेत.
पूर्वपीठीका-
नेपाळच्या पूर्व भागात,अरुण नदीवर, अरुण 3 हा 900 मेगावाटचा जल विद्युत प्रकल्प आहे.यातली चार सयंत्र प्रत्येकी 225 मेगा वाट वीज निर्मिती करणार आहेत.
B.Gokhale/N.Chitale/D. Rane
(Release ID: 1567019)
Visitor Counter : 114