आदिवासी विकास मंत्रालय

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने लघु वन उत्पादकांसाठी सुरु केली किमान आधारभूत किंमत योजना

Posted On: 28 FEB 2019 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 50 लघु वन उत्पादकांसाठी किमान आधारभूत किंमत योजनेचा प्रारंभ केला आहे.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी आज नवी दिल्लीत ‘वन-धन’ योजनेचा प्रारंभ केला. तसेच लघु वन उत्पादकांच्या साखळी विकास कार्यक्रमासह इतर योजनांचाही प्रारंभ केला.

30 राज्यातील प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी या योजनेच्या विविध पैलूंविषयी विस्तृत चर्चाही करण्यात आली.

वन-धन विकास योजनेचा देशातल्या घनदाट जंगलात राहणाऱ्या साडेपाच कोटी आदिवासींना लाभ होईल, असे ओराम यांनी सांगितले. या योजनेमुळे आदिवासींमधील उद्योजकता आणि विपणन कौशल्याला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1566676)
Read this release in: English