रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी करणार रस्ते जोडणी प्रकल्पांची पायाभरणी
Posted On:
28 FEB 2019 3:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक, नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिंग रोड-डीएनडी नाक्याला दिल्ली-मुंबई जलदगती मार्गाला जोडणाऱ्या 6 मार्गिकांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे.
59 कि.मी. लांबीचा महामार्ग रिंग रोड-डीएनडी नाक्यापासून सुरु होणार असून, कालिंदी कुंज-मिठापूर रोड इथे दिल्ली-मुंबई जलदगती मार्गाला जोडला जाणार आहे. या प्रकल्पाला 3 हजार 580 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नवी दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इतर 9 प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत.
N.Sapre/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1566614)