रेल्वे मंत्रालय

रेल्वेमधे प्रवाशांचा आरक्षण तक्ता पूर्ण झाल्यानंतर रिकाम्या आसनाची माहिती देणाऱ्या नव्या सुविधेचे पियुष गोयल यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 27 FEB 2019 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019

 

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रवासाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी, रेल्वेतला प्रवाशांचा आरक्षण तक्ता पाहण्याची आणि रिक्त आसनांची माहिती देणाऱ्या नव्या सुविधेचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत उद्‌घाटन केले.

प्रवासी आरक्षण तक्त्यानुसार आरक्षित जागांची माहिती जनतेला आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाद्वारे इंटरनेटवर उपलब्ध होईल. यामुळे इच्छूक प्रवाशांना आरक्षण तक्ता पूर्ण झाल्यानंतर रिकाम्या आसनांची माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे.

रिकाम्या आसनांची पूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याने ऑनलाईन आरक्षणासाठी याचा उपयोग होणार आहे.

यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव समृद्ध होण्याच्या दृष्टीने शकलेले हे आणखी एक पाऊल असल्याचे पियुष गोय यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

 

 

N.Sapre/N.Chitale/D. Rane

 


(Release ID: 1566547) Visitor Counter : 186
Read this release in: English