संरक्षण मंत्रालय
2700 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे खरेदीसाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजूरी
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2019 1:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2019
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत 2700 कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी मंजूरी देण्यात आली.
देशाच्या नौदलातल्या छात्र प्रशिक्षणासाठी तीन जहाजांच्या खरेदीला मंजूरी देण्यात आली. अधिकारी प्रशिक्षण घेणाऱ्या महिला छात्रांसह, छात्रांना प्राथमिक सागरी प्रशिक्षण घेण्यासाठी या जहाजांचा उपयोग होणार आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत, आपत्ती काळातली मदत, शोध आणि बचाव कार्य यासाठी ही जहाजे उपयुक्त ठरणार आहेत.
N.Sapre/N.Chitale/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1566469)
आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English