विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैव तंत्रज्ञान विभागाच्या स्थापना दिनानिमित्त महत्वपूर्ण अभियानाचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 26 FEB 2019 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,26 फेब्रुवारी 2019

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा 33 वा स्थापना दिन आज नवी दिल्लीत साजरा करण्यात आला. जैव तंत्रज्ञान – कल्पकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देणारे राष्ट्र म्हणून भारताची उभारणी करणे ही यासाठीची संकल्पना आहे.

यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जैवतंत्रज्ञान संशोधन नाविन्यता आणि तंत्रज्ञान सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले. अटल जय अनुसंधान, बायोटेक मिशन राष्ट्रीय स्तर तंत्रज्ञान नाविन्यता उपक्रम यांचा समावेश आहे. या नाविन्यता उपक्रमामुळे आरोग्य, कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडेल अशी अपेक्षा आहे.

आरोग्य, सुधारीत पीक जाती, पशु निदान, स्वच्छ ऊर्जा, उत्पादनासाठी तंत्रज्ञान यासाठी मापक दरातल्या उपायांचा विकास आणि व्यावसायिकीकरणाद्वारे अनेक क्षेत्रात व्यापक प्रमाणात प्रभाव निर्माण करण्यात जैव तंत्रज्ञान विभागाची 33 वर्षातली भूमिका त्यांनी विशद केली. क्षमता निर्माण, जैव तंत्रज्ञान स्टार्ट अप प्रणालीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात झालेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली.

 

 

N.Sapre/N.Chitale/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1566397) आगंतुक पटल : 642
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English