सांस्कृतिक मंत्रालय

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत गांधी शांतता पुरस्कारांचे वितरण

Posted On: 25 FEB 2019 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2019

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी गांधी शांतता पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे:

  1. विवेकानंद केंद्र, कन्याकुमार, 2015
  2. अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल, 2016 (संयुक्तरित्या)
  3. एकल अभियान ट्रस्ट, 2017

आणि

  1. शा योहे ससाकावा, 2018

अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या गांधी शांतता पुरस्कारांची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली. 1 कोटी रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारताचे पंतप्रधान या पुरस्कारासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष असतात, तर सरन्यायाधीश, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, तसेच दोन मान्यवर यांचा निवड समितीत समावेश असतो.

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1566255) Visitor Counter : 223
Read this release in: English