वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

बौद्धिक मालमत्ता स्पर्धेसाठी सीआयपीएएमने मागवल्या प्रवेशिका

Posted On: 25 FEB 2019 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2019

 

बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रचार आणि व्यवस्थापन विभागातर्फे शालेय, पॉलिटेक्निक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘IPrism’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीमध्ये नवकल्पना आणि कल्पकता वाढीला लागावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे युवा नवनिर्मिती करणाऱ्यांना त्यांच्या संकल्पना राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी मिळणार आहे.

यावर यंदाच्या स्पर्धेत दैनंदिन जीवनात बौद्धिक मालमत्ता ही संकल्पना असून, चित्रपट निर्मिती आणि चित्रकथा निर्मिती या दोन प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. चित्रपट निर्मिती विभागात 60 सेकंदाचा ॲनिमेशन/ चित्रपट व्हिडिओ सादर करायचा आहे, तर चित्रकथा निर्मिती विभागात 5 पानांपेक्षा कमी कॉमिक स्ट्रीप सादर करायच्या आहेत. विजेत्या संघाला 2 लाख रुपयांचे रोख इनाम दिले जाणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थेला विशेष चषक प्रदान करण्यात येईल. 30 मे 2019 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

 

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 


(Release ID: 1566253)
Read this release in: English