संरक्षण मंत्रालय

एअरो इंडिया 2019 चा समारोप

Posted On: 24 FEB 2019 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2019

 

बंगळुरु मधल्या येलहांका हवाईदल तळावरील एअरो इंडिया 2019 चा आज समारोप झाला. यंदा एअरो इंडियाचे 12 वे वर्ष होते. या शो साठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

यावर्षीच्या शो ची वैशिष्ट्ये अशी होती:

  1. 600 हून अधिक भारतीय कंपन्या तसेच 200 परदेशी कंपन्यांचा सहभाग, आशियातील सर्वात मोठा एअर शो
  2. 28,398 चौरस मीटर परिसरात शो चे आयोजन
  3. संरक्षण मंत्रालयासह इतर मंत्रालयांतर्फे अनेक चर्चा सत्रांचे आयोजन

या शो चे पहिले तीन दिवस उद्योग क्षेत्रासाठी राखीव होते. या तीन दिवसात 2 लाखांहून अधिक जणांनी या शो ला भेट दिली. व्यापारा संदर्भात अनेक गोलमेज परिषदाही झाल्या.

भारतातील हवाई क्षेत्रातील विकास दर्शवण्यासाठी हा योग्य मंच होता. यावर्षी पहिल्यांदाच ड्रोन ऑलिम्पिक आयोजित करण्यात आले होते, ज्यात 58 प्रवेशिका आल्या. तीन दिवसांमध्ये स्टार्ट अप, तंत्रज्ञान आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी परदेशी कंपन्यांचे 13 आणि भारतीय कंपन्यांच्या 11 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्रातील विकासासंबंधित चर्चा केली. यावेळी 50 सामंजस्य करारही करण्यात आले.

भारतीय हवाई क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करणारा विशेष कार्यक्रम शनिवारी झाला. हवाई वाहतूक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच हवाई क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी विशेष टपाल तिकीटही प्रकाशित करण्यात आले.

विविध प्रकारच्या विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी उपस्थितांचे मन वेधून घेतले. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई गाला यांच्या उपस्थितीत शो चा समारोप झाला.

 

 

N.Sapre/J.Patankar/D. Rane

 



(Release ID: 1566183) Visitor Counter : 100


Read this release in: English