जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
हरिद्वारमधल्या चंडीघाट येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते 5,894 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2019 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2019
रस्ते आणि महामार्ग, नौवहन, जलस्रोत, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीविकरण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल हरिद्वारमधल्या चंडीघाट येथे 5,894 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.
स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानांतर्गत संपूर्ण उत्तराखंडमध्ये 18 पंपिंग केंद्रांसह नव्याने बांधण्यात आलेल्या 6 मलप्रक्रिया संयंत्रांचा यात समावेश आहे.
5,555 कोटी रुपये खर्चाच्या सात राष्ट्रीय महामार्गंसाठी पायाभरणी गडकरी यांनी केली.
बाणगंगा आणि सोनाली या नद्यांच्या पुनरुज्जीवन योजना गडकरी यांनी जाहीर केली. 33,000 हेक्टर कृषी क्षेत्राला उपयुक्त इक्बालपूर कालव्याच्या कामाचे उद्घाटन त्यांनी केले.
‘द मेकिंग ऑफ चंडी घाट’ आणि ‘घाटस् इन उत्तराखंड’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
N. Sapre/S.Kakade/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1565953)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English