Posted On:
21 FEB 2019 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2019
रशिया भारताचा जुना, कायम भारताच्या पाठीशी असलेला भागीदार असून, दोन्ही देशांमधले संबंध कायम विश्वासाचे आणि अत्यंत सामंजस्याचे राहिले असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियातील लघू व मध्यम उद्योगांच्या परस्परसंवादी मंचाला आज बंगळुरु येथे त्यांनी संबोधित केले.
राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांमुळे द्विपक्षीय संबंधांनी नवी उंची गाठली असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
भारत जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, वर्ष 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणावरील मध्यमवर्गीय ग्राहकांसह भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले. हे स्थान गाठण्यासाठी देशाला अधिक आणि सुधारित पायाभूत सुविधा, ऊर्जा पुरवठा, गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा आणि आधुनिक कृषी क्षेत्राची गरज आहे, रशियाकडे सर्वोत्तम वैज्ञानिक भांडार असून, दोन्ही देशांमधल्या शैक्षणिक संस्था आणि उद्योगांतील समन्वयाला आपण चालना दिली पाहिजे. लघू आणि मध्यम उद्योगांना त्यांच्यासाठी उपलब्ध संधींबाबत अवगत करण्याची आवश्यकताही प्रभू यांनी व्यक्त केली.
N. Sapre/S.Kakade/D. Rane