शिक्षण मंत्रालय

ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ


देशात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी ऑपरेशन डिजिटल बोर्ड क्रांतिकारी पाऊल – प्रकाश जावडेकर

Posted On: 20 FEB 2019 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2019

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ केला. ऑपरेशन डिजिटल बोर्ड क्रांतिकारी पाऊल असल्याचे जावडेकर यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया संवादात्मक आणि आवडीची होईल. देशातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 9 वी पासूनच्या इयत्तांमध्ये डिजिटल बोर्ड असेल, असे जावडेकर यांनी सांगितले. या प्रक्रियेला 2019 च्या आगामी सत्रापासून सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

ऑपरेशन डिजिटल बोर्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोग कार्यान्वयन संस्था असेल. वर्ष 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक वर्गापर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी आयोगाने 29 जून 2018 ला ठराव मंजूर केला आहे.

 

 

N. Sapre/S.Kakade/D. Rane

 


(Release ID: 1565629) Visitor Counter : 225


Read this release in: English