आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

शाळांमधल्या माध्यान्न भोजन राष्ट्रीय कार्यक्रमात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 FEB 2019 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

माध्यान्न भोजन योजनेच्या निकषांत सुधारणा करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 2019 -20 या वर्षासाठी या योजनेकरिता 12,054 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अतिरिक्त 8000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण खाते हे अनुदान देणार आहे. या योजनेच्या निकषात सुधारणा करण्यात आली असून त्याचबरोबर नव्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार आहे.

स्वयंपाकाच्या किमतीत महागाई निर्देशांकाशी संलग्न वार्षिक वाढ. या वर्षी स्वयंपाकाच्या खर्चात वाढ करत 4.35 आणि 6.51 रुपये प्रती बालक, प्रती शाळा झाली आहे. अशा प्रकारे  361 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे भाववाढीचा माध्यान्न भोजन योजनेतल्या अन्न पदार्थांवर होणारा परिणाम झेलता येणार आहे.

ईशान्येकडील राज्ये आणि हिमालयीन राज्ये सोडून इतर राज्यांसाठी वाहतुकीच्या खर्चात सुधारणा करत 75 रुपये प्रती क्विंटल, कमाल मर्यादा 150 रुपये प्रती क्विंटल, व्यवस्थापनात सुधारणा. देखरेख खर्चात वाढ केल्याने या योजनेवर, अधिक उत्तम देखरेख ठेवणे, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना शक्य होणार आहे.

स्वयंपाक उपकरणांसाठी मदतीत प्रती शाळा 5000 रुपयांवरून 10000- 25000 रुपयांपर्यंत, नोंदणीवर आधारित  वाढ.

10 वर्षापेक्षा जास्त जुन्या स्वयंपाक घरांच्या दुरुस्तीसाठी 10000 रुपये प्रती स्वयंपाकघर, या नव्या घटकाचा समावेश.

अन्न पदार्थांचे सुयोग्य वर्गीकरण करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी निर्धारित. यामुळे अनिमिया आणि पोषण विषयक कमतरता भरून काढण्यासाठी मदत होणार.

एमएचआरडीच्या पूर्वसंमतीने वार्षिक कार्य आराखड्याच्या 5 टक्के रक्कम नव्या बाबींसाठी उपयोगात आणण्यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना परवानगी. यामुळे कल्पकतेला वाव मिळणार आहे.

वाढदिवस, लग्न यासारख्या प्रसंगी  माध्यान्न भोजन योजनेत योगदान देण्यासाठी प्रोत्साहन.

कल्पक स्वयंपाकासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता, जिल्हा,राज्य स्तरावर पाककला स्पर्धा आयोजित करणे.

केंद्र सरकारच्या राखीव डाळ साठ्यातून डाळींचा वापर.

माध्यान्न भोजनासाठीच्या उपस्थिती बाबत शाळांमधून प्रत्येक दिवशी माहिती घेणे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 

 



(Release ID: 1565524) Visitor Counter : 106


Read this release in: English