मंत्रिमंडळ
नियमनरहित ठेव योजना प्रतिबंधक अध्यादेश 2019, ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
19 FEB 2019 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमनरहित ठेव योजना प्रतिबंधक अध्यादेश 2019, ला मंजुरी देण्यात आली.
लाभ:
या प्रस्तावित अध्यादेशामुळे, देशभरातील, काही संशयित व्यक्तींनी अधिक पैसा मिळवण्याच्या हेतूने सुरु केलेल्या, कुठलेही नियमन नसलेल्या बनावट ठेवा योजनांना तात्काळ अटकाव करता येईल. सध्या अशा अनेक संशयास्पद कंपन्या, नियम-कायद्यांमधील त्रुटींचा गैरफायदा घेत, सर्व सामान्य जनतेने आयुष्यभर कष्टाने कमावलेला पैसा लुबाडत असतात. या अध्यादेशामुळे, अशा संशयास्पद कंपन्यांना सरळ बंदी घालता येईल. तसेच, ज्या ठेवीदारांचे पैसे अशा लोकांनी बनावट योजनांमधून बुडवलेले असतील, ते वसूल करणे आणि अशा गुन्हेगारांना शिक्षा करणे अशीही तरतूद या अध्यादेशात आहे.
B.Gokhale/R.Aghor /D. Rane
(Release ID: 1565517)