मंत्रिमंडळ

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 साठी मंत्रीमंडळाची मान्यता

Posted On: 19 FEB 2019 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने खालील प्रस्तावाना मंजुरी दिली

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा- 2 ची अंमलबजावणी. यामध्ये एकूण 28.254 किलो मीटरच्या दोन कॉरीडॉरचा समावेश आहे. मोटेरा स्टेडीयम ते महात्मा मंदिर या 22.838 तर जीएनएलयु ते गिफ्ट सिटी या 5.416 किमी कॉरीडॉरचा समावेश आहे. यासाठी  5384.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लाभ-

या प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि गांधीनगर साठी आवश्यक अतिरिक्त सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 

 


(Release ID: 1565512) अभ्यागत कक्ष : 78
Read this releasein: English