मंत्रिमंडळ
स्वदेश दर्शन योजना : देशात संकल्पना आधारित पर्यटक परिक्रमा एकीकृत विकासाला मंत्री मंडळाची मान्यता
Posted On:
19 FEB 2019 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019
मंत्रिमंडळाने या प्रस्तावांना मान्यता दिली-
स्वदेश दर्शन योजना 14 व्या वित्त आयोगाच्या काळात आणि त्यानंतरही सुरु राहील.
2019 च्या डिसेंबर मधे पूर्ण होणाऱ्या 60 प्रकल्पांसाठी 2055.96 कोटी रुपये
सप्टेंबर 2020 मधे पूर्ण होणाऱ्या आणि ज्यासाठी पुरेसा निधी जारी करण्यात आला आहे अशा 6 प्रकल्पांसाठी 324.09 कोटी रुपये
तपशील- स्वदेश दर्शन योजना – देशातल्या पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पर्यटन मंत्रालयाची ही योजना आहे.
या योजनेची उद्दिष्टे याप्रमाणे आहेत-
पर्यटनाला आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीचा स्त्रोत म्हणून स्थापित करणे
पर्यटक क्षमता असणाऱ्या परिक्रमा प्राधान्याने आणि नियोजनबद्ध रीतीने विकसित करणे.
विशिष्ट क्षेत्रात उपजीविकेची साधने निर्माण करण्यासाठी देशाच्या सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास करत पर्यटकांचा ओढा वाढवणे
स्थानिक समुदायात पर्यटनाचे महत्व निर्माण करणे
स्थानिक समुदायाच्या सक्रीय सहभागाने रोजगार निर्मिती
रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासाठी पर्यटन क्षेत्राच्या क्षमतांचा उपयोग करणे.
या योजने अंतर्गत घन कचरा व्यवस्थापन, पर्यटन रिसेप्शन केंद्र, पार्किंग यासारख्या खाजगी क्षेत्र गुंतवणुकी साठी इच्छुक नसलेल्या सार्वजनिक सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.
B.Gokhale/N.Chitale/D. Rane
(Release ID: 1565500)
Visitor Counter : 152