मंत्रिमंडळ

रेल्वेतील संघटित समूह ‘ए’ च्या 8 सेवांच्या कैडर समीक्षेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 FEB 2019 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, रेल्वेतील  संघटित समूह ‘ए’ च्या 8 सेवांच्या कैडर समीक्षेला मंजुरी दिली आहे. त्या या प्रमाणे –

भारतीय रेल्वे  लेखा सेवा (आयआरएएस), भारतीय रेल्वे  कार्मिक सेवा (आयआरपीएस), भारतीय रेल्वे  वाहतूक सेवा (आयआरटीएस), भारतीय रेल्वे इंजीनियरिंग सेवा (आयआरएसई), भारतीय रेलवे विद्युत अभियंता सेवा (आयआरएसईई), भारतीय रेल्वे यांत्रिक अभियंता सेवा (आयआरएसएमई), भारतीय रेलवे स्‍टोर्स सेवा (आयआरएसएस), भारतीय रेल्वे सिग्‍नल अभियंता सेवा (आयआरएसएसई) आहेत.

मंत्रिमंडळाने आयआरपीएससाठी  एक कैडर पद सदस्‍य (कर्मचारी)  पद संवर्गित करायला आणि  महासंचालक  (सिग्‍नल आणि दूरसंचार), महासंचालक  (स्‍टोर्स) आणि महासंचालक (सुरक्षा) पदांची नावे बदलून अनुक्रमे सदस्‍य (सिग्‍नल आणि दूरसंचार), सदस्‍य (सामग्री व्यवस्थापन ) आणि महासंचालक   (सुरक्षा) करायला मंजुरी दिली आहे.

ही  कैडर समीक्षा 2012 पासून प्रलंबित होती आणि यामुळे या सेवेतील 900 अधिकाऱ्यांना लाभ मिळेल.

 

 

B.Gokhale/S.Kane/D. Rane

 

 


(Release ID: 1565485) अभ्यागत कक्ष : 108
Read this releasein: English