मंत्रिमंडळ

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 FEB 2019 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019

 

निर्णय

पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इले‍क्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय द्वारा प्रस्‍तावित राष्‍ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण 2019 (एनपीई 2019) ला मंजुरी दिली आहे. या धोरणात चिप सेटसह महत्‍वपूर्ण सुटे भाग देशात विकसित करण्याच्या  क्षमताना प्रोत्‍साहन देऊन आणि जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी पोषक वातावरण तयार करून भारताला  इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रणाली संरचना आणि निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

 

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019 ची ठळक वैशिष्ट्ये

-जागतिक स्तरावर स्पर्धात्मक  ईएसडीएम क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण तयार केले जाईल : ईएसडीएमच्या संपूर्ण मूल्य साखळीत देशान्तर्गत उत्पादन निर्मिती आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल.

-प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक सुट्या भागाच्या निर्मितीसाठी  प्रोत्‍साहन आणि साहाय्य दिले जाणार आहे.

-अत्‍यंत उच्च तंत्रज्ञान आणि ज्यात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे अशा सेमी कंडक्‍टर सुविधा, डिस्‍प्‍ले फैब्रिकेशन सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी प्रोत्साहनाचे विशेष पॅकेज दिले जाईल.

-नवीन कारखान्याना प्रोत्साहन आणि सध्याच्या कारखान्यांचे विस्‍तारीकरण करण्यासाठी उपयुक्‍त योजना आणि  प्रोत्‍साहन देण्याशी संबंधित व्‍यवस्‍था आखल्या जातील.

-इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या सर्व उप-क्षेत्रांमध्ये  उद्योग प्रणित संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये 5 जी, आईओटी /सेंसर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई), मशीन लर्निंग, वर्चुअल रियल्‍टी (वीआर), ड्रोन, रोबोटिक्‍स, एडिटिव मैन्‍युफैक्‍चरिंग, फोटोनिक्‍स, नैनो आधारित उपकरणे आदी क्षेत्रात  प्रारंभिक टप्प्यातील स्‍टार्ट-अप्‍सचा समावेश आहे.

-कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रोत्‍साहन आणि सहाय्य दिले जाईल. यामध्ये कामगारांचे कौशल्य पुन्हा सुनिश्चित करणे समाविष्ट आहे.

-फैबलेस चिप डिजाइन उद्योग, वैद्यकीय इलेक्‍ट्रॉनिक उपकरण उद्योग, ऑटोमोटिव इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योग आणि मोबिलिटी आणि धोरणात्मक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगासाठी पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍सवर  विशेष भर दिला जाईल.

-ईएसडीएम क्षेत्रात आईपीचा विकास आणि अधिग्रहण यांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वभौम स्वामित्व निधी (एसपीएफ) स्थापन केला जाईल.

-राष्‍ट्रीय सायबर सुरक्षा व्‍यवस्‍था सुधारण्यासाठी विश्वासार्ह इलेक्‍ट्रॉनिक्‍स मूल्‍य श्रृंखला (वैल्‍यू चेन) संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

 

 

B.Gokhale/S.Kane/D. Rane

 

 



(Release ID: 1565483) Visitor Counter : 318


Read this release in: English