पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या झारखंडच्या दौऱ्यावर

Posted On: 16 FEB 2019 8:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 फेब्रुवारीला झारखंडमधल्या हजारीबाग आणि रांचीला भेट देणार आहेत. आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासंदर्भातील विविध प्रकल्पांचे अनावरण ते करणार आहेत. यातील अनेक प्रकल्प झारखंडमधल्या आदिवासींसाठी लाभदायक ठरणार आहेत.

हजारीबाग, दुमका आणि पलामू येथे तीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत. तसेच हजारीबाग, दुमका, पलामू आणि जमशेदपूर येथे 500 खाटांच्या चार रुग्णालयांसाठी ते पायाभरणी करणार आहेत.

रामगढ आणि हजारीबाग येथे चार ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत. तसेच या दोन जिल्ह्यात आणखी सहा ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी आणि हजारीबाग येथे शहरी पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी ते करतील.

‘नमामि गंगे’ अभियानांतर्गत मधुसूदन घाटाचे आणि साहिबगंज मलनिस्सारण संयंत्राचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील.

रामगढमधल्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील.

हजारीबाग येथे आचार्य विनोबा भावे विद्यापीठात आदिवासी अभ्यास केंद्रासाठी पायाभरणी पंतप्रधान करतील.

ई-नामअंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल फोन खरेदी करण्यासाठीच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान निवडक लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करतील.

विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारी दूध योजनेचा प्रारंभ पंतप्रधान करतील.

रांची येथे पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना-आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1565075) Visitor Counter : 72
Read this release in: English