नौवहन मंत्रालय

नौवहन मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांतर्गत भारतात बांधण्यात आलेल्या जहाजांना प्राधान्य


मुंबईत उद्या क्षेत्रीय सागरी सुरक्षा परिषदेत नितीन गडकरी नव्या धोरणाचे अनावरण करणार

Posted On: 18 FEB 2019 3:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2019

 

नौवहन मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांतर्गत भारतात बांधण्यात आलेल्या जहाजांना प्राधान्य मिळणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्याच्या दृष्टीने आणि देशांतर्गत जहाज बांधणीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने नौवहन मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यामुळे अशा जहाजांसाठी मागणी वाढून त्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

नौवहन, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीविकरण मंत्री नितीन गडकरी यासंदर्भातल्या धोरणाचे अनावरण उद्या मुंबईत क्षेत्रीय सागरी सुरक्षा परिषदेत करतील.

या परिषदेचे प्रथमच भारतात आयोजन होत आहे. भारत-आसियान उपक्षेत्रातील सागरी सुरक्षा व्यापार वृद्धी, धोकादायक मालाची वाहतूक, तेलगळती, पर्यावरण सुरक्षा, वाहतूक सुरक्षा, कायदे, जहाजबांधणी अशा विविध मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. राष्ट्रीय सागरी संस्थेने नौवहन मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे.

 

N.Sapre/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1565005) Visitor Counter : 208


Read this release in: English