अर्थ मंत्रालय

सिमलासाठी पहिल्या व्यावहारिक पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण सेवा सुधारणा विकास धोरण ऋण यासाठी भारताने जागतिक बँकेसमवेतच्या विधी करारावर स्वाक्षऱ्या केल्या

Posted On: 15 FEB 2019 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2019

 

गेल्या काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या जलजन्य रोगांचा मुकाबला करणाऱ्या सिमलावासियांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी मदत करणाऱ्या 40 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ऋण करारावर भारत सरकार, हिमाचल प्रदेश सरकार आणि जागतिक बँकेने आज स्वाक्षऱ्या केल्या.

सिमला जलपुरवठा आणि मलनिस्सारण सेवा सुधारणा विकास धोरण ऋण एक मुळे सिमला आणि लगतच्या परिसरात पाणी पुरवठा आणि स्वच्छता सेवात सुधारणा होणार आहे.

वित्त मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे, जागतिक बँकेचे देशासाठीचे संचालक जुनैद कमाल अहमद आणि हिमाचल प्रदेशच्या नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव प्रबोध सक्सेना यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1564765) Visitor Counter : 60


Read this release in: English