नौवहन मंत्रालय

भारतीय नाविकांसाठीच्या रोजगारात यावर्षी अभूतपूर्व 35 टक्के वाढ


ऑन बोर्ड प्रशिक्षणासाठी ठेवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 37 टक्क्यांनी वाढली

Posted On: 15 FEB 2019 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2019

 

भारतीय किंवा विदेशी नौकांवरच्या भारतीय नाविकांच्या रोजगारात या वर्षी 35 टक्के अशी अभूतपूर्व वाढ झाली आहे. 2017 मधे ही संख्या 154349 इतकी होती तर 2018 मधे 208799 एवढी झाली. याशिवाय ऑन बोर्ड प्रशिक्षणासाठीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही 37 टक्क्यांची वाढ दर्शवत गेल्या वर्षीच्या 14307 वरुन यावर्षी ही संख्या 19545 वर पोहोचली आहे.

भारतीय जहाजांवर रोजगार प्राप्‍त करणाऱ्या नाविकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या 22,103 वरुन यावर्षी 27,364 पर्यंत वाढ झाली आहे तर परदेशी जहाजांवर रोजगार प्राप्त करणाऱ्या नाविकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या 60,194 वरुन यावर्षी 72,327 पर्यंत वाढ झाली आहे. अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्यांच्या संख्येतही 2018 मधे वाढ होऊन ही संख्या 72327 वर पोहोचली आहे. रेटींगच्या संख्येतही 72,052 वरुन 109108 पर्यंत वाढ झाली आहे. भारतीय नाविकांच्या संख्येतही 2013 मधल्या 103835 वरुन 2015 मधे 126945 पर्यंत वाढ झाली आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1564752) Visitor Counter : 106


Read this release in: English