श्रम आणि रोजगार मंत्रालय

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 15 फेब्रुवारीपासून अंमलात येणार

Posted On: 14 FEB 2019 6:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2019

 

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना उद्यापासून अंमलात येणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत अधिसूचित करण्यात आले होते. देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या सुमारे 42 कोटी कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे.

घरून काम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, माध्यान्ह भोजन कार्यक्रमातील कामगार, विटभट्टी कामगार, कचरा वेचणारे, धोबी, रिक्षा ओढणारे, भूमीहीन मजूर, विडी कामगार आदी व्यवसायातील महिन्याला 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी कमाई असणारे आणि 18 ते 40 वयोगटातील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, पात्र व्यक्ती आयकर दाता/दाती असता कामा नये तसेच इएसआयसी, इपीएफओ किंवा एनपीएसची लाभधारक असता कामा नये.

या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमा 3000 रुपये निश्चित निवृत्ती वेतन मिळेल. तसेच लाभधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या/तिच्या नवरा/बायकोला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मृत लाभधारकाच्या निवृत्तीवेतनाच्या 50 टक्के वेतन मिळेल.

लाभधारकाने नियमित वर्गणी भरली असेल आणि 60 वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचा/तिचा त्या व्यक्तीचा नवरा/बायको या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असेल.

या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची वर्गणी त्याच्या/तिच्या बँक बचत खात्यातून जनधन खात्यातून थेट वळती होईल.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1564611) Visitor Counter : 357


Read this release in: English