आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

"अनुसूचित जमातींच्या विकासासाठी एकछत्री कार्यक्रम"अंतर्गत उप-योजना मार्च २०२० पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाची मंजुरी


१० कोटींहून अधिक अनुसूचित जमातीच्या लोकांना मिळणार लाभ

Posted On: 13 FEB 2019 10:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने "अनुसूचित जमातींच्या विकासासाठी एकछत्री कार्यक्रम"अंतर्गत उप-योजना 1.4.2017 ते  31.3.2020 पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे. यासाठी 11,900 कोटी रुपये खर्च येणार आहे.

मंजूर योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश आहे-

1मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती

२. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

3. आश्रमशाळा

4. मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह

5 व्यावसायिक प्रशिक्षण

6 देखरेख आणि मूल्यमापन

7 आदिवासी महोत्सव, आदिवासी संशोधन, माहिती आणि लोक शिक्षण

8 अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत

9  विशेषतः दुर्बल आदिवासी समूहांचा विकास

10 लघु वन मालासाठी किमान आधारभूत किंमत

11आदिवासी उप-योजनांसाठी राज्यांना विशेष केंद्रीय साहाय्य

प्रभावः

  उप-योजनामुळे अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी कर्यक्रम आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मदत होईल.

लाभार्थीः

  या योजनेमुळे अनुसूचित जमातीच्या 10 कोटींहून अधिक लोकसंख्येला लाभ मिळेल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(Release ID: 1564475) Visitor Counter : 102
Read this release in: English