मंत्रिमंडळ

तामिळनाडूच्या  कुन्नुर येथे नवीन वायरल लस निर्मिती कारखाना स्थापन करण्यासाठी  पास्चर इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला 30 एकर जमीन वितरित करायच्या प्रस्तावाला  मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 FEB 2019 10:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूच्या  कुन्नुर येथे नवीन वायरल लस निर्मिती कारखाना स्थापन करण्यासाठी  पास्चर इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला 30 एकर जमीन वितरित करायच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पामुळे पीआयआय, कुन्नूर येथे  वायरल लस  (उदा. टीसीए कांजिण्या प्रतिबंधक लसजपानी इंसेफ्लाइटिस लस वगैरे ) आणि  एंटी सीरा (उदा. सर्प विष प्रतिबंधक आणि  एंटी रैबिज सीरा) चे उत्पादन केले जाईल. जमिनीच्या हस्तांतरणासाठी कुठलाही खर्च येणार नाही.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारा या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीसाठी  औद्योगिकऐवजी संस्थागतअसा बदल केला जाईल.

लाभ :

जमीन वितरित केल्यामुळे मुलांसाठी  जीवन रक्षक लसीच्या उत्पादनाला चालना मिळेल. तसेच देशात लसीकरण सुरक्षा बळकट होईल आणि लसीचा खर्च कमी होईल आणि आयातीवरील खर्चही कमी होईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1564466) Visitor Counter : 57


Read this release in: English