मंत्रिमंडळ

बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापर क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि फिनलंड यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 FEB 2019 10:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापर क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि फिनलंड यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. १० जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

प्रभाव-

या करारामुळे पृथ्वीचे  रिमोट सेन्सिंग, उपग्रह दळणवळण, उपग्रह दिशादर्शन, अंतराळ विज्ञान आणि बाह्य अंतराळाचा शोध या क्षेत्रात संशोधनाच्या नवीन संधी आणि वापराच्या शक्यतांची चाचपणी करायला चालना मिळेल.

मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित करायला फिनलंड सरकारच्या सहकार्यामुळे मदत होईल.

तपशील-

या करारामुळे पुढील संभाव्य क्षेत्रात सहकार्याच्या शक्यता आहेत.

पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग

उपग्रह दळणवळण आणि उपग्रह दिशादर्शन

अंतराळ विज्ञान आणि ग्रहीय शोध

अंतराळातील बाबींचा विकास, परीक्षण

अंतराळ माहितीचे विश्लेषण आणि वापर

अंतराळ तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर आणि तोडगा विकसित करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

उदयोन्मुख नवीन अंतराळ संधी आणि माहिती, आणि शाश्वत वापराबाबत सहकार्य

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे

या करारांतर्गत सहकार्याबाबत समन्वय राखण्यासाठी एक समन्वयक नेमला जाईल. या कराराच्या अंमलबजावणीसाठी उभय पक्ष भारतात किंवा फिनलंडमध्ये किंवा विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे भेटू शकतील.

प्रकल्प व्यवस्थापनासाठी आवश्यकता भासल्यास प्रकल्प पथक उभारता येईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1564465) Visitor Counter : 69


Read this release in: English