मंत्रिमंडळ

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन करण्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 FEB 2019 10:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन करण्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

भारत आणि मोरोक्कोने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केल्यावर दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये मदत मिळेल. त्यामुळे दहशतवादी कारवायांबाबत माहिती मिळवण्यासाठी आणि माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी हा सामंजस्य करार आधार ठरेल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1564464) Visitor Counter : 43


Read this release in: English