मंत्रिमंडळ

भारतात गुंतवणुकीसंबंधी पायाभूत सुविधांसाठी एक यंत्रणा स्थापन करण्याबाबत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 FEB 2019 10:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात गुंतवणुकीसंबंधी पायाभूत सुविधांसाठी एक यंत्रणा स्थापन करण्याबाबत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

या करारामुळे देशाच्या पायाभूत क्षेत्रात संभाव्य गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सौदी अरेबियाच्या संस्थांना सहभागी करून घेता येईल. यामुळे देशात पायाभूत विकासाला चालना मिळेल, रोजगार निर्मितीत वाढ होईल, जीडीपी विकास दर वाढीबरोबरच एकूणच आर्थिक प्रगती साध्य होईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1564460) Visitor Counter : 39


Read this release in: English