उपराष्ट्रपती कार्यालय

संसदेतील चर्चेचा स्तर उंचावून जनमानसात संसदेची चांगली प्रतिमा निर्माण करणे हिच अटलींना खरी श्रद्धांजली – उपराष्ट्रपती


दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारा द्रष्टा नेता म्हणजे अटलजी – उपराष्ट्रपती

Posted On: 12 FEB 2019 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2019

 

संसद सदस्यांनी संसदेतील चर्चेचा स्तर उंचावून जनसामान्यांच्या मनात संसदेबद्दलची एक चांगली प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज संसदपटूना केले. संसदेबद्दलची  ही प्रतिमा खऱ्या अर्थाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली ठरेल असे उपराष्ट्रपती म्हणाले.

संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहातल्या वाजपेयी यांच्या छायाचित्राचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झाले त्यावेळी ते बोलत होते. संसदेतील दूरदर्शी हस्तक्षेप आणि आदर्श वागणुकीद्वारे वाजपेयी यांनी लोकशाहीची मुळे खोलवर रुजवली असं नायडू म्हणाले.

युती सरकारचे कार्य आणि प्रशासनाच्या माध्यमातून अटलजींनी लोकशाही मजबूत करण्याचा आदर्श समोर ठेवला असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणारे अटल बिहारी वाजपेयी हे एक द्रष्टा नेता होते असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले.

समाजातील वेगवेगळ्या स्तरातील तसेच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांना जोडण्याची अद्भुत कला वाजपेयी यांच्याकडे होती. ते एक अजातशत्रू होते असेही ते म्हणाले. तसेच उत्तम प्रशासक, उत्तम राजनेता, उत्तम व्यक्ती, उत्तम वक्ता, उत्तम संसंदपटू असे विविध गुण असलेले ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

 

 

B.Gokhale/S.Tupe/D. Rane



(Release ID: 1564115) Visitor Counter : 103


Read this release in: English