पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्राच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 12 FEB 2019 3:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2019

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहातल्या छायाचित्राचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज अनावरण झाले.

उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. अटलजी आता छायाचित्र रुपाने संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात सदैव राहणार असून, आपल्याला स्फूर्ती देत राहतील.

अटलजींच्या महानतेविषयी बोलायचे झाल्यास कित्येक तासांचा वेळही अपूराच पडेल.

अटलजींची प्रदीर्घ राजकीय कारर्कीद होती. त्यापैकी बराच काळ संसदेत विरोधक म्हणूनच त्यांनी भूमिका बजावली. जनहिताचे अनेक मुद्दे त्यांनी सातत्याने उपस्थित केले.

अटलजींच्या ओघवत्या वाणीतल्या भाषणात जितकी ताकद होती, तेवढीच त्यांच्या मौनातही होती.

त्यांचे संवाद कौशल्य अजोड होते आणि त्यांना विनोदाची उत्तम जाणही होती, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 



(Release ID: 1563998) Visitor Counter : 70


Read this release in: English