पंतप्रधान कार्यालय

स्वच्छ शक्ती 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन


देशभरातल्या महिला सरपंचांचा होणार सत्कार

Posted On: 11 FEB 2019 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2019

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणातल्या कुरुक्षेत्रला भेट देणार आहेत.स्वच्छ शक्ती 2019 या महिला सरपंचांच्या परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार असून आहेत.स्वच्छ शक्ती 2019 पारितोषिके त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.कुरुक्षेत्र इथे स्वच्छ सुंदर शौचालय प्रदर्शनाला ते भेट देणार असून जनसभेलाही ते संबोधित करणार आहेत.हरियाणातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

स्वच्छ शक्ती 2019 या राष्ट्रीय कार्यक्रमात,स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण महिलांनी बजावलेली नेतृत्व भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.देशभरातल्या महिला सरपंच आणि पंच या वेळी उपस्थित राहणार आहेत.

पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाने,हरियाणा सरकारच्या सहकार्याने,स्वच्छ शक्ती 2019 चे आयोजन केले आहे.स्वच्छ भारत अभियानात,ग्रामीण भागात,अवलंब करण्यात आलेल्या उत्तम प्रथा यावेळी मांडण्यात येतील.स्वच्छ भारत आणि नुकत्याच राबवण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेतली कामगिरी यावेळी दर्शविण्यात येणार आहे.

पूर्वपीठिका:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये स्वच्छ शक्ती कार्यक्रमाला,गुजरात मधल्या गांधीनगर इथे सुरवात केली.

स्वच्छ शक्ती-2018 हा स्वच्छ शक्ती विषयक दुसरा कार्यक्रम उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथे झाला होता.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1563917) Visitor Counter : 164


Read this release in: English