माहिती आणि प्रसारण मंत्रालय

69 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडिया नेटवर्किंग गाला’चे आयोजन


इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवासाठी भारताकडून निमंत्रण
कान फिल्म मार्केट 2019 मधील भारताचा सहभाग आणि कान चित्रपट महोत्सवात इफ्फीचे स्थान याबाबत चर्चा

Posted On: 11 FEB 2019 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2019

 

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (बर्लिन) 2019 च्या पार्श्वभूमीवर भारतीय शिष्टमंडळाच्या वतीने  इंडिया नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी चित्रपट महोत्सवांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटना, चित्रपट संस्था आणि, भारताबरोबर या क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक असलेल्या  प्रख्यात चित्रपट निर्मिती संस्था आदी उपस्थित होते.

या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवासाठी भागीदारी विकसित करणे तसेच चित्रपटांच्या सह-निर्मितीसाठी यशस्वी बंध निर्माण करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. चित्रपट चित्रीकरणासाठी संपर्क केंद्र म्हणून काम करण्यासाठी www.ffo.gov.in या  वेब पोर्टल द्वारे भारतात चित्रपट सुलभीकरणासाठी सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांविषयी तसेच सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सुधारणा करुन फिल्म पायरसीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांविषयी सहभागी प्रतिनिधींना यावेळी माहिती देण्यात आली.

तत्पूर्वी, कान फिल्म मार्केट 2019 मधील भारत सरकारच्या सहभागाबद्दल भारतीय चित्रपटमंडळाने कान चित्रपट महोत्सवाचे सेल्स अँड ऑपरेशन्सचे प्रमुख मोड एम्सन, यांची भेट घेतली.

चीन इंटरनॅशनल चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष होउकेमिंग, एआरएस व्हिडिओर स्टुडिओचे निर्माता अण्णा समर्त्सेवा, इकोईएम एसएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅनो कुआनीस यांची देखील भारतीय शिष्टमंडळाने भेट घेतली. इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात ग्रीस सरकार सक्रियपणे सहभागी होईल असे पॅनो कुआनीस म्हणाले. या सहभागामुळे उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि विविध संस्थांनी, भारत आणि इफ्फी 201 9 सोबत सहकार्याबाबत इच्छा व्यक्त केली असून, त्यामुळे भारताला चित्रपटाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने मीडिया आणि मनोरंजन उद्योगासाठी आकर्षक विकास संधी उपलब्ध होणार आहेत.

 

N.Sapre/S.Tupe/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563902) Visitor Counter : 74


Read this release in: English