रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत महामार्ग प्रकल्पाच्या 6 विभागातील 82,000 कामगारांना प्रशिक्षण


इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढण्यासाठी सरकारकडून अनेक पावले, सध्या देशात 3.14 लाख इलेक्ट्रीक वाहने

Posted On: 11 FEB 2019 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2019

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन आणि रसायने आणि उर्वरक खात्याचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेमध्ये गेल्या आठवड्यात लेखी उत्तरात सांगितले की, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कौशल्य विकास कार्यक्रम राबवला आहे. महामार्ग बांधणी क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना राबवण्यात आली. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या दिशा-निर्देशानूसार ही योजना राबवण्यात आली. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या महामार्ग प्रकल्पांच्या कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत 95,000 कामगारांनी नाव नोंदणी केली आहे तर 82,000 कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सहा विभागातील गवंडी, बार बेंडिंग, मचान, शटरींग/सुतारकाम, प्लंबिंग आणि रंगकाम या विभागातील कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

आणखी एका लेखी उत्तरात मांडवीय यांनी सांगितले की, देशातील रस्तेनिर्मितीमध्ये रबराचा वापर केला जात आहे. यामुळे रस्त्याची गुणवत्ता सुधारुन कमीतकमी नूकसान होईल. सरकारने देशात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी विविध पावलं उचलली आहेत. यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना परवान्यापासून मुक्तता, इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरव्या रंगाची नोंदणी पट्टी, पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांना रेट्रो-फिटमेंट किंवा हायब्रीड इलेक्ट्रीक प्रणाली बसवण्यास परवानगी. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी गुणवत्तापूर्ण चार्जिंग सुविधा. इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरामुळे केवळ इंधनबचतच नाही तर पर्यावरणाचे प्रदुषणापासून रक्षणही होईल.  

 

N.Supre/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1563861) Visitor Counter : 54


Read this release in: English