पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी 2019 रोजी श्रीनगर इथे देशभरातल्या विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

Posted On: 03 FEB 2019 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2019

 

प्रश्न- प्रिय,माननीय पंतप्रधान,मी के दीपिका, तेलंगणातल्या,हैदराबाद मधल्या बेगमपेठ इथल्या शासकीय महिला पदवी महाविद्यालयामधून बी.ए पत्रकारितेच्या शेवटच्या वर्षाला आहे.सर,गेल्या पाच वर्षात शिक्षण क्षेत्रात आम्ही अनेक उपक्रम पाहिले.शिक्षण क्षेत्रातल्या आमच्या प्रयत्नांबद्दल आपण समाधानी आहात का ? मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

सूत्रसंचालक- आम्ही, गेल्या पाच वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम पाहिले.शिक्षण क्षेत्रातल्या आपल्या प्रयत्नांबद्दल आपण समाधानी आहात का ? माननीय, कृपया  सांगा.  

पंतप्रधान- या प्रश्नाबद्दल आणि देशभरातल्या सुमारे अडीच कोटी युवकांसमवेत संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी आभारी आहे.तंत्रज्ञानाचे आभार.एकाच गोष्टीकडे दोन बाजूनी पाहता येऊ शकते.प्रयत्नांबाबत बोलायचे झाले तर, मला याचा आनंद आहे की आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.ठोस वेळापत्रक घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत आणि जगात, शिक्षण क्षेत्रात जे मापदंड आहेत तो जागतिक दर्जा आम्ही साध्य करू इच्छितो.आपल्या देशातल्या सर्व युवकांना, शिक्षणाच्या ज्या क्षेत्रात जायचे आहे त्यांना,ती संधी मिळायला हवी अशी आमची इच्छा आहे.अशी व्यवस्था विकसित करणे हे सरकारचे एक काम आहे.आधुनिक भारतासाठी ज्या प्रकारच्या संस्थांची रचना असली पाहिजे, त्यासाठी आम्ही बळ देत आहोत.आयआयटी असू दे आयआयएम असू दे त्यांच्या विस्तारासाठी वेगाने काम सुरु आहे.अशाच प्रकारे कौशल्य विकास एक खूप मोठे क्षेत्र आहे, ज्यावर आम्ही भर देत आहोत.आपल्या देशातले युवक शिक्षणासाठी मोठ्या संख्येने परदेशात जातात.आपले करोडो रुपये परदेशात जातात.आपल्या देशातले लोक परदेशात जाण्याऐवजी जगभरातल्या देशातले लोक भारतात यावेत अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.हे स्वप्न बाळगून मी काम करत आहे.दिशेच्या बाबतीत विचाराल तर मी खूपच संतुष्ट आहे. साडेचार वर्ष इतक्या कमी कालावधीत जितके काम झाले आहे ते पाहता मीच काय कोणीही संतुष्ट होईल.स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मी संतोष व्यक्त करत नाही.माझा संतोष याचा अर्थ आहे नवी स्वप्न, माझा संतोष याचा अर्थ आहे नवे लक्ष्य निश्चित करणे,माझा संतोष याचा अर्थ आहे ही लक्ष्य साध्य करण्यासाठी पुन्हा वाटचाल सुरु करणे.संतोष स्वस्थ राहण्यासाठी नव्हे तर संतोष नवी स्वप्ने साकार करण्यासाठी आहे.धन्यवाद.

सूत्रसंचालक- धन्यवाद,माननीय पंतप्रधान जी,आता आपण देशाच्या ईशान्य भागातल्या आसामशी संपर्क साधत आहोत,वस्त्र विद्यापीठातून अनामित्रा महंत आपल्याला काही विचारू इच्छितात...

प्रश्न-माननीय पंतप्रधान,आसाममधून,मी अनामित्रा महंत.सर, शिक्षणासह दैनंदिन जीवनात, या डिजिटल इंडियाचे अनेक उपयोग आपण पाहतो.आपला देश आणि आपली जनता यावर याचा कसा परिणाम आपल्याला जाणवतो? माझा प्रश्न संपला.धन्यवाद.

सूत्रसंचालक-सर,आपल्या रोजच्या आयुष्यात आपण डिजिटल इंडियाचे अनेक उपयोग पाहतो.ज्यात शिक्षणाचाही समावेश आहे. आज आपला देश आणि इथल्या लोकांवर यामुळे काय बदलआपण पाहत आहात,माननीय कृपया सांगा.

पंतप्रधान- मानवाचा विकास निरंतर सुरु आहे. तंत्रज्ञान हा यामधला महत्वाचा घटक राहिला आहे.नव-नव्या शोधांनी मानवाच्या जीवनात सातत्याने बदल घडले आहेत.मात्र चाळीस वर्षापूर्वी ज्या वेगाने बदल घडले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने,जगाला गेल्या 200-300 वर्षात बदल घडवत जिथपर्यंत आणले होते,मात्र गेल्या 40-50 वर्षात तंत्रज्ञानाने एक अशी झेप घेतली आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नवे परिमाण लाभले आहे.अंतराळ असो,सागरी तळ असो,जमीन असो,डिजिटल जगताने यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.आज मी आपणाशी अगदी सहज संवाद साधु शकत आहे.मी श्रीनगर मधे आहे आणि श्रीनगरहून हिंदुस्तानच्या प्रत्येक भागातल्या अडीच कोटी युवकांशी, शिक्षणाविषयी संवाद साधू शकत आहे.हाच मोठा प्रभाव आहे.आताच आपण पाहिले की बांदीपोरा मधे एका बीपीओचे उद्घाटन झाले.हा डिजिटल क्रांतीचा परिणाम आहे. डिजिटल क्रांतीचा सर्वात मोठा फायदा,आपण पहा ना आपले आधार एक प्रकारे डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. जगाला मी जेव्हा सांगतो, की आमच्याकडे 120 कोटी लोकांचा इतका तपशीलवार डाटा अर्थात माहिती आहे तेव्हा जगभरातल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटते.अशी संपत्ती आहे आपल्याकडे, हा डिजीटल क्रांतीचाच परिणाम आहे. आपण JAM सुरु केले आहे,भारत सरकारने JAM द्वारा अर्थात आधार, मोबाईल, जन धन कोणतीही व्यक्ती सरकारला काही सामान पाठवू इच्छिते,गाव गरीब असेल तर ऑनलाईन येईल,याद्वारे ती व्यक्ती ते पाठवू शकते.शिक्षणाच्या क्षेत्रात आज इतके ऐप उपलब्ध आहेत आणि काही तर खर्चावाचून म्हणजेच मोफत उपलब्ध आहेत.यामुळे विद्यार्थी, नव-नवे शिक्षण घेण्यासाठी या ऐपच्या माध्यमातून काही होम वर्क म्हणजे तयारी  करतो.कदाचित असा काळ येईल की शिकवणी आणि कोचिंग क्लास ही व्यवस्था नष्ट होऊ शकते.इतकी ताकद या डिजिटल इंडिया मधे आहे.डिजिटल जगताने प्रशासनात खूप मोठी भूमिका बजावली आहे.पारदर्शकतेसाठी फार मोठी ताकद डिजिटल जगतात आहे.,शिक्षणच नव्हे तर एक प्रकारे संपूर्ण जीवन व्यवस्थेत, डिजिटल जगत आपल्या शरीराचा एक नवा भाग बनला आहे.आपण त्यावाचून जगू शकत नाही अशी स्थिती झाली आहे.म्हणूनच आपण याचा योग्य वापर कसा करायचा,जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग कसा करायचा यावर आपण भर दिला तर डिजिटल शक्ती एक मोठी क्रांती आपल्यासमोर आहे.दुसरे म्हणजे दूरस्थ शिक्षण.गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत,दुर्गम डोंगराळ भागात,जंगलात, दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून, दरेदार शिक्षण देऊ शकतो.डिजिटल कनेक्टीविटी यासाठी मोठी भूमिका निभावू शकते. अनेक युवक व्हर्च्युअल प्रयोगशाळेच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचे काम करत असल्याचे मी पाहत आहे.प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन काम करत असल्याप्रमाणेच या मुलांना शिकता येते.त्याचा आत्मविश्वास वाढतो.आज विद्यार्थ्याला हृदयाबाबत अभ्यास करायचा असेल तर  त्याला 3 डी दाखवल्यावर लगेच लक्षात येते,की हृदय असे काम करते,यापूर्वी,विद्यार्थ्यांना समजण्यासाठी, शिक्षक किती समजावून सांगत असत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक सर्वेक्षण केले होते.माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत प्राथमिक सरकारी शाळात काय प्रभाव जाणवतो आणि तिथे डिजिटल स्मार्ट क्लास रूम तयार केली तर काय फरक जाणवतो.काही शाळा अशा होत्या जिथे अशा डिजिटल स्मार्ट क्लास रूम तयार करण्यात आल्या होत्या तर काही शाळात डिजिटल स्मार्ट क्लास रूम नव्हत्या.माध्यान्न भोजनावर भर देण्यात आला होता. डिजिटल स्मार्ट क्लास रूम होत्या तिथेही माध्यान्ह भोजन होते,तर अनुभव असा आला,की डिजिटल स्मार्ट क्लास रूमने मुलांना आकर्षित केले.झोपडीमधली मुले तिथे शिकत होती त्यांना शिकताना मजा येत होती.येऊन बसत होती,त्यांना माध्यान्ह भोजनाचे काही वाटत नव्हते. माध्यान्ह भोजनासाठी त्यांना आग्रहाने न्यावे लागत असे.जिथे केवळ माध्यान्न भोजन होते तिथे एवढ्या मोठ्या संख्येने मुले येत नव्हती.स्मार्ट क्लास नसल्यामुळे मुलांना तिथे बसण्यात रुची नव्हती.हा डिजिटल प्रभाव आहे आणि येत्या काळात,उच्च शिक्षणात याची मोठी भूमिका राहणार आहे.धन्यवाद....

सूत्रसंचालक-माननीय,कुरुक्षेत्र विद्यापीठ,हरियाणा मधून गौरव आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे, गौरव...

प्रश्न- माननीय पंतप्रधान,माझे नाव गौरव आहे,मी कुरुक्षेत्र विद्यापीठ,हरियाणा मधून आहे,सर,आपल्या देशातली गरिबी पाहून मनाला वेदना होतात,आपल्या देशात, दारिद्रय निर्मुलनासाठी आपले प्रयत्न आम्ही पाहत आहोत.भारत,भविष्यात दारिद्रय मुक्त होईल असे आपल्याला वाटते का?

सूत्रसंचालक- आपल्या देशातली गरिबी पाहून मनाला वेदना होतात,आपल्या देशात,दारिद्रय निर्मुलनासाठीचे आपले प्रयत्न आम्ही पाहत आहोत. भारत,भविष्यात दारिद्रय मुक्त होईल असे आपल्याला वाटते का?माननीय कृपया सांगा.

पंतप्रधान-देशाने जर दारिद्रय मुक्त होण्याचा निश्चय केला असेल तर जगातली कोणतीही शक्ती आपल्याला गरीब ठेवू शकत नाही.सव्वाशे कोटी देशवासीयांचे इतके सामर्थ्य आहे की आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ यांचे योग्य नियोजन करून आपण वाटचाल केली,तर दारिद्र्य मुक्त होणे कठीण नाही.साडेचार वर्षांच्या अनुभवाने मी हे सांगू शकतो.या जगात दोन गोष्टी समोर आल्या आहेत.जगातल्या सर्वात वेगाने विकास पावणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमधे  भारत प्रथम आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.दुसरे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय एजन्सीनुसार,जगात,गरिबीतून वेगाने बाहेर पडणाऱ्या देशात भारताचा पहिला क्रमांक आहे. अतिशय वेगाने नव मध्यम वर्गाचे बळ वाढत आहे.यातही त्यांनी म्हटले आहे की भारतातल्या  अनुसूचित जाती आणि मुस्लीम या दोन वर्गातले सर्वात जास्त लोक लाभार्थी असून हा वर्ग झपाट्याने गरिबीतून बाहेर पडत आहे.महात्मा गांधी यांची स्वच्छता आणि स्वातंत्र्य यापैकी एकाची निवड करायची झाल्यास स्वच्छतेच्या निवडीला प्राधान्य राहील.गांधीजीनी खूप प्रयत्न केले.स्वातंत्र्याचे आंदोलनही सुरु होते आणि स्वच्छतेची चर्चाही सुरु होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण हे काम सहजपणे पुढे नेऊ शकत होतो. मी लाल किल्ल्यावरून आवाहन केले, देशाला आवाहन केले आणि आपला देश, आपल्या प्रयत्नांनी,स्वच्छतेच्या बाबतीत आज वेगाने समाधानकारक वाटचाल करत आहे.जम्मू-काश्मीर,हे अधिकारी इथे बसले आहेत, याआधी अनंतनागमधे होते,बहुतेक त्यांनी माझ्या हस्ते स्वच्छतेबाबतचे पारितोषिक घेतले आहे. फार मोठे काम केले होते, देशाला मोठा अभिमानही वाटला.एवढे मोठे काम,आज जम्मू काश्मीर हागणदारी मुक्त होणे ही फारच मोठी बाब आहे. 2014 मधे आम्ही सत्तेवर आलो तेव्हा आपल्या देशात ग्रामीण भागात स्वच्छता जाळे 38 टक्के होते ते आता 98 टक्के झाले आहे.हे केवळ सरकारमुळे झाले असे मी कधीच म्हटले नाही.एकदा जनतेने निश्चय केला की कसा परिणाम दिसून येतो हे आपण पाहतो आहे.या देशाने निश्चय केला की देशात बँकांचे राष्ट्रीयीकरण फार आधीपासून झाले आहे,मात्र गरिबाची खाती उघडत नव्हती. प्रत्येक गरिबाचे खाते उघडण्याचा आम्ही निश्चय केला. हिंदुस्तान मधे,2014 मधे 40 टक्के लोकांची बँक खाती होती आज साधारणतः100 टक्के बँक खाती आहेत.आपल्या देशात 25-26 कोटी कुटुंबे आहेत,ढोबळ आर्थिक हिशोब मला सांगण्यात आला.कारण राज्ये हे आकडे देतात.सुमारे 4 कोटी कुटुंबे अशी होती जिथे वीज नाही. आम्ही निश्चय केला की प्रत्येक घरात वीज असायला हवी, मला आनंद आहे की जम्मू-काश्मीरने हे काम पूर्ण केले याचा मला आनंद आहे.म्हणजेच एकदा देशाने निश्चय केला की या समस्येतून बाहेर पडायचे आहे की नक्की बाहेर पडणार.आता जम्मू-काश्मीरने स्वप्न पहिले आहे की घरात नळाद्वारे पाणी द्यायचे,फार मोठे स्वप्न आहे.जम्मू काश्मीरची चमू हे काम नक्कीच करेल याचा मला विश्वास आहे. इथले प्रशासन हे उद्दिष्टही साध्य करेल.आपल्या देशात आपल्याला निश्चय करायचा आहे.आपल्याला गरिबीशी लढा द्यायचा आहे आणि गरिबीशी लढा द्यायचा म्हणजे रेवडी वाटणे नव्हे तर गरिबाला सबल करणे,त्याचे सशक्तीकरण करणे होय.गरिबीतून बाहेर पडण्याची जिद्द त्याच्या मनात निर्माण करावी लागते.मला वाटते त्याच्या स्वभावातच ही जिद्द निर्माण केली तर तो हे करेल.आपण जेव्हा शिक्षण देतो,आयुष्मान भारत योजनेद्वारे आरोग्या च्या गोष्टी करतो तेव्हा गरीबालाही वाटते की आता माझे चांगले दिवस आले आहेत,मी प्रगती करू शकतो.माझ्या आई-वडिलांनी गरिबीत जीवन व्यतीत केले,माझ्या मुलांनी गरिबीत आयुष्य घालवू नये यासाठी मी प्रयत्न करेन.हे वातावरण मी पाहतो आहे आणि ज्या दिशेने वाटचाल करत आहोत ते पाहता वेगाने गरिबी घटत जाईल.गरिबीपासून मुक्ती मिळत राहील आणि असा दिवस आपण  आपल्या डोळ्याने पाहू, की देश  दारिद्रयापासून मुक्त झाला आहे.

सूत्रसंचालक-धन्यवाद, माननीय,आज देशाचे बदललेले चित्र पाहून आजचा युवक अधिक उत्साही झाला आहे.माननीय,ओदिशातल्या उत्कल विद्यापीठातली अंकिता आपल्याला काही सांगू इच्छिते.

प्रश्न-माननीय पंतप्रधान,मी अंकिता, ओदिशातल्या उत्कल विद्यापीठातुन आहे,आमच्या इथे अनेक वारसा स्थळे आणि सुंदर समुद्र किनारा आहे,इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काही करावे असे अनेकवेळा मनात येते पण काय करावे समजत नाही.आपल्या मते, कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची,पर्यटनाशी सांगड घालून ओदिशासाठी काही करता येईल.

पंतप्रधान-आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्यातल्या शिक्षणाचा प्रभाव मी पाहत आहे,ओदिशाची ताकद आपण जाणता आणि त्याचा उपयोग कसा करता येईल याचा विचारही करत आहात.मी पाहतोय की पंखे सुरु आहेत, श्रीनगर वासियांना आश्चर्य वाटत असेल.आपल्या देशात पर्यटनासाठी मोठी क्षमता आहे मात्र या क्षेत्राबाबत आपण थोडी उदासीनता बाळगली.पर्यटनाची पहिली अट म्हणजे आपल्या गोष्टींचा अभिमान बाळगायला शिकावे लागते.आपली सवय आहे ती म्हणजे आपले आहे ते सर्व बेकार आहे, हे काही नाही, हे थोडे ठीक आहे,अशी धारणा बाळगण्याची.आपणच नाही पाहिले,आपणच अभिमान बाळगला नाही तर जग का येईल बरे..आपण पाहिले असेल जगात जिथे पर्यटन वाढले आहे,तिथे एक छोटासा स्तंभ असला तरी गाईड तिथे नेऊन त्यासंदर्भातली अशी गोष्ट सांगेल, असे गुणगान करेल की आपल्याला वाटेल हेच सर्व काही आहे आणि आपण हा,निर्माण केले असेल, जाऊ दे ना, सगळे पैशाचा अपव्यय करतात असे मानतो.अर्थव्यवस्थेचे सर्वात वेगाने वाढणारे कोणते क्षेत्र असेल तर ते म्हणजे पर्यटन आहे.पर्यटनाचा ट्रीलीयन डॉलरचा व्यापार वाढत आहे आणि वाढणार आहे.मला आठवतंय की अनेक वर्षांपूर्वी मी अमेरीकी सरकारच्या निमंत्रणावरून एकदा अमेरिकेला गेलो होतो.तिथे विचारले की आपल्याला कशात रुची आहे?मी लिहुन पाठवले, माझ्यासारखा माणूस आधी मिळाला असेल किंवा नाही मला माहित नाही,मी सांगितले होते की मला तुमच्याकडे गावात जाऊन तिथली शेतीची प्रक्रिया काय आहे हे पहायचे आहे.दुसरे मी सांगितले की मला अगदी गावातली शाळा असेल तर ती पहायची आहे. तिसरे मी सांगितले की गावात जो आरोग्य विभाग आहे,अगदी गाव,जिथे छोटी वस्ती आहे, ते मला पहायचे आहे आणि चौथी गोष्ट मी सांगितली की अमेरिकेची सर्वात पुरातन गोष्ट,ज्याचा अमेरिकेला अभिमान आहे,ती गोष्ट मला पहायची आहे.आपल्याकडे अगदी कोणत्या गल्लीत गेले तरी हे 2 हजार वर्ष पुरातन आहे, हे 3 हजार वर्ष पुरातन आहे असे सांगतात.किती थोर परंपरा आहे आपल्याकडे.मात्र आपण पाहिजे तितक्या भावनेने ते केले नाही.पर्यटन उपजीविका देते.आपण पहा ना, ओदिशा इतके समृध्द आहे, इतके समृध्द आहे,तिथले समुद्र किनारे पहा,स्थापत्य पहा,कोणार्क पहा,तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातूनही एक नाविन्य आहे.2000 वर्ष पुरातन रचना आहे हे माहित आहे.ही अद्भुत बाब आहे. आपण पर्यटनाला चालना द्यायला हवी.मागच्या काही काळापासून आपल्या देशात पर्यटन वाढले आहे हे खरेच आहे,आधी 70 हजार पर्यटक येत असत,या वर्षी 1 कोटी पर्यटक आले.परदेशातून येणाऱ्या पर्यटकांकडून याआधी सुमारे18 दशलक्ष डॉलर परकीय चलन मिळत असे ते आता 27 दशलक्ष डॉलर वर पोहोचले आहे.सुमारे 50 टक्के वृद्धी.पर्यटक भारतात वाढू लागले आहेत,भारताबाबतचे आकर्षण वाढले आहे.मात्र स्वच्छतेचा त्यात मोठा प्रभाव आहे.नागरिकांचा स्वभावही पर्यटकांचा स्वीकार करणारा बनला आहे.आपण विद्यार्थी, जे शिक्षण घेत आहेत,ओदिशामधून आहेत,तंत्रज्ञानाशी जोडलेले आहेत.उबरच्या धर्तीवर आपण नौजवानही एक मोठा व्यवसाय सुरु करू शकता, पर्यटनाचा असे मला वाटते.कोणते कुटुंब होम स्टे ची सुविधा देऊ इच्छिते, ते यावर असेल असे ऐप एखादी व्यक्ती तयार करू शकते की भारतात पर्यटनासाठी,आपल्या घरातून निघुन परत आपल्या घरात पोहोचेपर्यंत आपण उबर प्रमाणे संपूर्ण यंत्रणा विकसित करू शकतो.क्राउड सोर्सिंग करून आणि जगाशी जोडले जाऊ शकतो.उबरच्या धर्तीवर  देशभरात होम स्टे कोण देते,याचा युवकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करत  शोध घेतला तर हिंदुस्तानमधे हॉटेलमधे जितक्या खोल्या आहेत त्यापेक्षा दहापट जास्त नव्या खोल्या पर्यटकांसाठी मिळतील याचा मला विश्वास आहे. मी नुकताच बनारसमध्ये प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम केला होता, मी काशीचा खासदार आहे,लोकांना मी सांगितले आणि मला आश्चर्य वाटले की हजारोंच्या संख्येने लोक, परदेशी पाहुण्यांसाठी,आपल्या घरातली एक खोली देण्यासाठी पुढे आले. आता हळू-हळू काशीमधला होम स्टे साठीचा एक मोठा व्यवसाय विकसित होईल.त्यांना सवय झाली.आज संपूर्ण जगभरात होम स्टे लोकप्रिय आहे.उबर सारखे ऐप विकसित करून मला वाटते माझ्यासमोर इतके युवक आहेत, तंत्रज्ञानाशी जोडलेले युवक आहेत,या,मैदानात उतरा आणि आपण उबर पेक्षाही पुढे जाल असा मला विश्वास आहे.

सूत्रसंचालक-धन्यवाद, माननीय पंतप्रधान, माननीय पंतप्रधानजी आपण गुजरात मधले आहात आणि आपण आता गुजरात मधे जात आहोत.गुजरात मधल्या एम एन महाविद्यालयातुन विजयकुमार आपल्याकडून काही जाणू इच्छितात.

प्रश्न-माननीय पंतप्रधान,नमस्कार,मी विजयकुमार, एम एन महाविद्यालय, वीस नगर, गुजरातमधून बोलत आहे.जेव्हापासून अर्थसंकल्प आला आहे,शेतकऱ्यांसाठी ज्या योजना लागू करण्यात आल्या आहेत त्याची चर्चा   चहुबाजुनी ऐकत आहे.शेतकऱ्यासाठी एवढी मोठी योजना लागू केली जाईल असा खरोखरच कोणी विचारही केला नसेल.सर मी ऐकले आहे की आपण पश्चिम बंगालमधे सांगितले आहे की येत्या दहा वर्षात सरकार शेतकऱ्यांसाठी 7 लाख 50 हजार कोटी रुपये खर्च करेल. सर माझा प्रश्न आहे की सरकार एव्हढे पैसे कोठून आणणार ... धन्यवाद.

पंतप्रधान तुम्ही विरोधी पक्षाचे वर्तमानपत्र वाचता वाटत, जाऊदे तुम्ही माझ्या गावचे शेजारी आहात, माझे गाव वडनगर आहे, तुम्ही विसनगरचे आहात आपल्या दोघांची गावं अगदी बाजुबाजुलाच आहेत तुम्ही तिथूनच बोलत आहात. आज आपल्या गावच्या लोकांशी पण संवाद साधत आहे मोदी याचा मला आनंद वाटतो आहे. तुम्ही ज्या भागातून बोलत आहात तिथल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे ही गोष्ट अगदी खरी आहे; पाण्याची टंचाई आहे, एक प्रकारे तो दुष्काळग्रस्त भाग आहे, माझा जन्म तिथेच झाला आहे त्यामुळे मला हे माहित आहे आणि तुम्ही तिथूनच बोलत आहात. खूपच समस्याग्रस्त भाग आहे तो. आपल्या देशात स्त्रोतांची कमतरता नाही. दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की, एक पंतप्रधान म्हणाले होते की, एक रुपया निधी जारी होतो आणि लोकांपर्यंत 15 पैसे पोहोचतात. आता फायदा हा झाला आहे की पूर्ण एक रुपया पोहोचतो, 100 पैसे पोहोचतात. सगळ्यात मोठे कारण हे आहे. दुसरे ,म्हणजे जेव्हा तुम्ही एक एक रुपयाचा योग्य वापर करता तेव्हा जो करदाता असतो तो देखील प्रामाणिकपणे कर भरतो, कारण त्याला माहित असते की, माझ्या पैशांचा योग्य वापर होत आहे. आता तुम्ही कल्पना करा, मी देशातील लोकांना सांगितले की जर आपल्याला गॅस सबसिडीची गरज नसेल तर मग ती घेऊ नका, कोणताही कायदा नाही बनवला, फक्त विनंती केली होती आणि माझ्या देशातील सव्वा कोटी कुटुंबांनी गॅस सबसिडी नाकारली त्याचा परिणाम असा झाला की, सव्वा कोटी गरिबांच्या घरी गॅस पोहोचला. काम झाले इतकी ताकद आहे संघटीत होण्यात. वरिष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये सूट मिळते, मी लोकांना सांगितले की, तुम्ही फॉर्म भरा, त्यात लिहा की मला सूट नको, कोणतीही विनंती केली नाही, मी कधीच विनंती केली नाही. कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात देखील नाही दिली. मी नंतर पहिले की, देशातील 42 लाख प्रवाशांनी सबसिडी सोडून दिली आहे. रेल्वेला पूर्ण पैसे दिले आपले पैसे सोडून दिले. पैसे या मार्गाने येतात. एकदा का वातवरणात प्रामाणिक आला की, लोकं पैसे द्यायला तयार होतात पैशामुळे कुठलाही अडथळा येत नाही. देश जलद गतीने 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आणि मी तुम्हाला एक रहस्य सांगतो की तुमचे जे मुख्य सचिव आहेत ते याआधी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करीत होते. आधी ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करायचे. जेव्हा मी आलो तेव्हा मी देखील त्यांना सोडत नव्हतो, त्यांनी मला एक दिवस सांगितले की सर तुम्ही भाषण देणार आहाततर तुम्ही सांगा की आपला देश 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, दोन वर्षांपूर्वी त्यांनी मला हे सांगितले होते. हा विचार माझ्या मनात आहे आणि आज मी पाहतो आहे की भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था नक्की बनेल, आपल्या डोळ्यासमोर हे शक्य होईल आणि पैशाचा योग्य वापर केला तर पैशाची काहीच कमतरता नसेल. तुम्ही बरोबर बोललात की, आगामी दहा वर्षात आम्ही या अर्थसंकल्पात ज्या योजना तयार केल्या आहेत. 10 वर्षात शेतकऱ्यांच्या खिशात 7 लाख कोटी जाणार आहेत, त्यामुळे ते सर्व परिस्थितीचा सामना करू शकतील. मला विश्वास आहे की, या योजनेमुळे देशातील शेतकरी आत्मविश्वासाने पुढे येईल.

धन्यवाद....

निवेदक पंतप्रधान सर तुमचे खूप आभार, यावेळी बरेच विद्यार्थी या कार्यक्रमाशी जोडले आहेत आणि ते आपल्याला ऐकू शकतात, स्क्रीनवर तुम्हाला पाहू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि देशाला नवीन प्रकाश देण्यासाठी माननीय पंतप्रधानजी तुमचे धन्यवाद. स्वतःला देशाचा प्रधान सेवक समजणारे माननीय पंतप्रधान तन मन ओतून देशसेवा करत आहेत.

पंतप्रधानांचे भाषण

मला आज ज्या तरुणांशी बोलायची संधी मिळाली, तुमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास आणि भविष्याविषयी तुमची सकारात्मकता पाहून माझा देखील उत्साह वाढला आहे, ह्या गोष्टी माझी ऊर्जा वाढवणाऱ्या आहेत. सर्वातआधी, मी या प्रश्नकर्त्यांचे आणि या कार्यक्रमासाठी देशभरातून आलेल्या तरुणांचे आभार मानतो. देशभरातून जे सहकारी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की इथे श्रीनगर मध्ये तापमान खूपच कमी आहे. कदाचित रात्री हे तापमान उणे होईल. असे असले तरीही तरुण सहकारी आणि काश्मिरी बंधू भगिनी उपस्थित आहेत. हेच काश्मीरचा उत्साह दाखवतो. काश्मिरी जनतेची भावना दर्शवतो.

व्यासपीठावर उपस्थित जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेंद्र सिंह, इथे उपस्थित  माझ्या बंधू आणि भगिनींनो,

मित्रांनो, आज इथे श्रीनगर मध्ये आलो आहे, शांतीसाठी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहीद नजीर अहमद वाणीसह शेकडो वीरांना मी श्रद्धासुमन अर्पण करतो. शहिद नजीर वाणी यांच्या अद्भुत साहसा बद्दल देशाने कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अशोक चक्र देऊन सन्मानित केले.शहिद वाणी सारखे तरुणच जम्मू-काश्मीर आणि देशातील प्रत्येक तरुणाला देशासाठी जगण्याचा आणि देशासाठी समर्पित होण्याचा मार्ग दाखवतात. अनेक वर्षांनंतर पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊन आपले प्रीतिनिधी निवडणाऱ्या जम्मू काश्मीरच्या लाखो लोकांचे मी अभिनंदन करतो.

लोकशाहीसाठी असलेली तुमची ही निष्ठा म्हणजे मत्सरी लोकांसाठी खूप मोठा संदेश आहे. काही लोकांनी त्यावेळी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला,त्यांनी दिलेल्या धमक्यांकडे लक्ष न देता तुम्ही ज्या मोठ्या संख्येने निवडणूक केंद्रांमध्ये पोहोचलात त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य आणि जम्मू आणि काश्मीरच्या विकासाची भावना अधिक बळकट केली आहे.

मित्रांनो, आज मला इथे अंदाजे 7 हजार कोटी रुपये खर्च होणाऱ्या योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाली. या सर्व प्रकल्पांमुळे श्रीनगर आणि आजूबाजूच्या भागातील लोकांचे आयुष्य सुकर व्हायला मदत होईल. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी निगडित या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

मित्रांनो, तुम्ही आज पाहिलंत की, शिक्षण व्यवस्थेशी निगडित एका मोठ्या कार्यक्रमाचे श्रीनगरने यजमान पद स्विकारले आहे. चार साडे चार वर्षांपूर्वी तुम्ही पाहिले असेल की, जितक्या मोठया कार्यक्रमांचे आयोजन व्हायचे किंवा केंद्र सरकारला कोणतीही योजना सुरू करायची असली की त्या संबंधातला कार्यक्रम दिल्ली मधील विज्ञान भवनात व्हायचा. परंतु आम्ही जुन्या सरकारच्या कार्य संस्कृतीलाच बदलले.

आमच्या सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरवात झारखंड मधून, उज्जवला योजनेची सुरवात उत्तरप्रदेश मधून, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना पश्चिम बंगाल इथून, हातमागाशी निगडित राष्ट्रीय अभियान तामिळनाडू इथून, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची सुरवात हरियाणा मधून आणि पोषण अभियानाची सुरवात राजस्थानला जाऊन केली.

देशातील एका महत्वपुर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आज आपण श्रीनगर इथे उपस्थित आहोत आणि देशभरातील कार्यक्रमांचा शुभारंभ आज मी श्रीनगरच्या भूमीतून करत आहे. आज इथे राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान अर्थात रुसच्या दुसऱ्या टप्प्याशी निगडित प्रकल्पाची सुरवात करण्यात आली, आज इथून देशभरातील 70 नवीन आदर्श पदवी महाविद्यालय, 11 व्यावसायिक महाविद्यालय, 1 महिला विद्यापीठ, 60 हुन अधिक उद्योजक, नवोन्मेष आणि करियर हबचे भूमिपूजन आणि उदघाटन करण्यात आले. यातील अनेक शिक्षण संस्था या जम्मू काश्मिरसाठी देखील आहेत.

मित्रांनो, या सगळ्यातून हेच निदर्शनाला येते की, नव भारत कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. नव भारताच्या निर्मितीसाठी आपला मार्ग कोणता आहे. संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअपसाठी देशात एक नवीन मनोवृत्ती विकसित केली जात आहे. देशभरात सुरू होत असलेल्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, अटल इनक्यूबेशन केंद्र यामुळे जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन हा आमचा संकल्प अधिक दृढ होत आहे. श्रीनगर आणि जम्मू-काश्मीर या सक्षमीकरणाचे साक्षीदार झाले आहेत.

मित्रांनो, स्टार्टअप इंडिया अभियानामुळेच आज भारत चीन आणि अमेरिकेनंतर तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश बनला आहे. गेल्या तीन चार वर्षांमध्ये 15 हजारांहून अधिक स्टार्टअप ची निवड करण्यात आली आहे. यातल्या अंदाजे 50 टक्के स्टार्टअप ची सुरवात प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी शहरांमध्ये करण्यात येत आहे.

मित्रांनो, स्टार्टअप सोबतच देशातील ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याला देखील आम्ही प्राधान्य देत आहोत. आज देशभरात तीन लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्र ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल सेवा प्रदान करत आहेत तसेच लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला आहे. आज बांदिपूर इथे राज्यातील पहिल्या बीपीओ ची सुरवात झाली आहे यामुळे बांदिपूरातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन करण्यात आले त्यांची सुरुवात, विकासाच्या शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत पावणे चारशे जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्थांची स्थापना केली जात आहे. समान संधींच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. या सर्व जिल्ह्यातील तरुणांना जेव्हा त्यांच्या घराच्या बाजूलाच चांगल्या संस्था उपलब्ध होतील तेव्हा त्यांची प्रतिभा अजून बहरेल आणि त्यांचे कौशल्य अजून विकसित होईल याचा मला विश्वास आहे.

मित्रांनो, जेव्हा नव भारताच्या आत्मविश्वासा बद्दल बोलतो तेव्हा त्यामागे एक भक्कम आधार असतो. जम्मू-काश्मीर मधील 9 वर्षाची मुले तसेच इस्लामी देशातील अनेक सहकारी कठीण परिस्थितीत देखील काही ठोस कारणांसाठी पुढे येत आहेत.

तुम्हा सगळ्या तरुण सहकाऱ्यांच्या या उत्साहाला, या आनंदाला केंद्र सरकार आणखी प्रोत्साहन देऊ इच्छिते. यासाठी खेलो इंडिया अभियानांतर्गत एक खूप मोठा प्रज्ञा शोध कार्यक्रम देशभरात राबवला जात आहे. छोट्या छोट्या शहरात, भागांमध्ये खेळासाठी उत्कृष्ट सुविधा तयार केल्या जात आहेत. इथे जम्मू-काश्मीरमध्ये देखील 22 जिल्ह्यांमध्ये बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याची योजना सुरू केली आहे. आज देखील गांदरबल इथे एका इनडोअर स्टेडियमचे उद्‌घाटन करण्यात आले.

मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये मागील 7-8 महिन्यांमध्ये विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. इथल्या सामान्य जनतेचं आयुष्य सुकर व्हावे यासाठी इथले प्रशासन कार्यरत आहे. मला असे सांगण्यात आले आहे की, मागील दहा-दहा, वीस-वीस वर्षांपासून रखडलेले प्रकल्प देखील पूर्ण झाले आहेत. मागील दोन महिन्यात शेकडो डॉक्टरांची भरती असो, बारामुलाचा पूल असो, असे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मागील वर्षी सप्टेंबर मध्येच नियोजित वेळेच्या आधीच राज्याला हागणदारीमुक्त केल्याबद्दल मी जम्मू काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करतो. तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात. मला हे देखील सांगण्यात आले की, जम्मू काश्मीर हे देशातील असे पहिले राज्य बनण्याचे लक्ष्य समोर ठेऊ कार्य करत आहे जिथे प्रत्येक गावात पिण्याचे पाणी पाईप लाईन द्वारे उपलब्ध होईल, ही बाब खूप प्रशंसनीय आहे.

मित्रांनो, आमचे सरकार नियोजित वेळेत उद्देश्यपूर्तीचा प्रामाणिक प्रयत्न करत असते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की, लाल किल्ल्यावरून मी इह हजार दिवसांच्या आत देशातील त्या 18 हजारांहून अधिक गावांपर्यंत वीज पोहचवण्याची घोषणा केली होती, जिथे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील अंधारच होता. ते लक्ष्य नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर सौभाग्य योजनेंतर्गत देशातील कोट्यावधी कुटुंबांना मोफत वीज जोडणी देण्याचे अभियान सुरु आहे. अंदाजे अडीच कोटी जोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणि लवकरच उर्वरित घरांना देखील प्रकाशमान केले जाईल. मला आनंद आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये देखील आता जवळजवळ प्रत्येक कुटुंबात वीज पोहोचली आहे. यासाठी मी इथल्या लोकांचे, वीज विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे, प्रत्येक अभियंत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. राज्य सरकारच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.

मित्रांनो, जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासोबतच पुरेशी वीज देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. लेह, लडाख, कारगिल असो जम्मू असो किंवा मग श्रीनगर तिन्ही ठिकाणी आज वीज निर्मिती आणि ट्रान्समिशनशी निगडीत अनेक मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची आज मला संधी मिळाली. येथील विजेची आवश्यकता लक्षात घेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. आधी भारताच्या हक्काचे पाणी जे वाया जात होते त्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग जम्मू-काश्मीरच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करत आहे. हाच विचार समोर ठेऊन अनेक ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.

मित्रांनो, पायाभूत सुविधांना सरकार देत असलेल्या प्रधान्यांचा परिणाम म्हणजेच हे सर्व प्रकल्प आहेत, रस्ते, वीज, शिक्षण असो किंवा मग प्राथमिक आरोग्य सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने देश वेगाने मार्गक्रमण करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी जम्मू आणि पुलवामा इथे सुरू होणाऱ्या दोन एम्सचे भूमिपूजन आजच करण्यात आले. या दोन्ही संस्थांमुळे राज्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडतील. ‍

मित्रांनो, आम्ही आधुनिक रुग्णालये तर उभारत आहोतच, त्यासोबतच जगातील सर्वात मोठी आयुष्मान भारत ही आरोग्य सुविधा योजना देखील राबवत आहोत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशातील गरिबांसाठी इतकी मोठी आरोग्य सुविधा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी गरिबांचे पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत.

देशातील अंदाजे 50 कोटी गरीब बंधू भगिनींचा यात समावेश होतो. यातील 30 लाख लाभार्थी जम्मू-काश्मीर मधील आहेत.

मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेमुळे आतापर्यंत देशातील 10 लाखांहून अधिक गरिबांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या योजनेला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. इतक्या कमी वेळात 10 लाख लोकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे लोकं जणू मरणाची वाट पाहत होते त्यांचासाठी हा खूप मोठा आधार झाला. त्यांना आता नवीन आयुष्य मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक दिवसाला आमच्या  दहा हजारांहून अधिक बंधू भगिनींचा मोफत उपचार होत आहे. आणि हे पन्नास कोटी लोकं. ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोची जितकी लोक्संख्या आहे त्याहून जास्त लोकांसाठी आमची आयुष्मान भारत योजना आहे. तुम्ही कल्पना करू शकता की हे किती मोठे काम आहे.

मित्रांनो, आयुष्मान भारत सारखी योजना एक भारत श्रेष्ठ भारताचे सर्वोत्तम उदाहरण आहे; कारण जम्मू-काश्मीरचा लाभार्थी देशात कुठेही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. समजा तुम्ही इथून मुंबईला गेलात आणि आजारी पडलात, तुम्ही जर इथे नोंदणी केली असेल तर मुंबईच्या रुग्णालयात देखील तुम्ही मोफत उपचार घेऊ शकता. मुंबईवरून जर कोणी इथे श्रीनगरला फिरायला आले आणि त्यांना काही समस्या आली तर इथे ते याचा लाभ घेऊ शकतात. सरकारने यासाठी योग्य प्रणाली तयार केली आहे. सामायिक स्रोत निर्माण करण्याची ही शक्ती आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत एकमेकाच्या उपयोगी पडणे हाच भारताचा आत्मा आहे, हीच काश्मीरची भावना आहे.

मित्रांनो, ही काश्मीरचीच कार्यपद्धती आहे, हिंसक घटनांच्यावेळी ज्या काश्मिरी पंडित बंधू भगिनींना इथून आपले घर, आपली जमिन, आपल्या पूर्वजांच्या आठवणी सोडून जावे लागले होते त्यांना संपूर्ण सन्मानासह इथे वसवले जाईल.

पंतप्रधान विकास पॅकेजच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू आहेत, राज्य सरकारने वैसू आणि सेकपुरा इथे संक्रमण शिबीर बांधण्यास सुरुवात केली आहे. बांदिपूरा आणि गांदेरबल इथे संक्रमण शिबिरांमधील सुविधांच्या विस्तार योजनेचे भूमिपूजन करण्याची आज मला संधी मिळाली. ही योजना देखील पंतप्रधान विकास पॅकेजचा एक भाग आहे.

मित्रांनो इथे एकदा 700 सदनिका तयार झाल्यानंतर विस्थापित परिवारांना नवीन छत मिळेल. ज्यांना इथे परत यायचं आहे त्यांना संपूर्ण सुरक्षा आणि सन्मानासह इथे राहायला मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

मित्रांनो, काश्मीरमधील विस्थापितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. वर्ष 2015 मध्ये जाहीर केलेल्या पंतप्रधान विकास पॅकेज अंतर्गत राज्य सरकारने तीन हजार नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. मला विश्वास आहे की ही भरती लवकरच पूर्ण होईल.

मित्रांनो, मी सुरवातीलाच सांगितल्या प्रमाणे, जम्मू- काश्मीरचे नायक शहीद नजीर अहमद वाणी, शहीद मोहम्मद औरंगजेब आणि तजामुर हुसेन सारखे तरुण ज्यांनी शांती आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपले प्राण पणाला लावले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो आपले आयुष्य पणाला लावतो तोच खरा नायक असतो. जो दुसरऱ्यांचा स्वप्नांचा चुराडा करतो तो सर्वात मोठा घाबरट असतो.

आज संपूर्ण देश निर्दोष, शस्त्रहीन काश्मिरी मुला मुलींची हत्या बघून संतापला आहे. या तरुणांना शांती हवी होती, त्यांना जगायचं होतं फक्त याच कारणांसाठी त्यांना दहशतवादाचा बळी करण्यात येत आहे. इथल्या दहशतवादाचा हाच खरा चेहरा आहे. संपूर्ण ताकदीने या दहशतवादाचा सामान केला जाईल असा विश्वास मी जम्मू- काश्मीरमधील तरुणांना आणि संपूर्ण  देशाला देतो. प्रत्येक दहशतवाद्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जगाला सांगितले आहे की आता भारताचे नवीन धोरण आणि नवीन पद्धत काय आहे.

आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये देखील दहशतवादाचे समूळ उच्चटन करू. जम्मू-काश्मीरचा विकास, इथल्या लोकांचा विकास याला आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे आणि नेहमीच दिले जाईल. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिक्षणाशी निगडीत योजनांच्या शुभारंभासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन करतो. अटल बिहारी वाजपेयींनी जे स्वप्न बघितले होते, त्यांनी आम्हाला वारसा म्हणूण जी कामं दिली आहेत, ती करताना आम्ही कोणतीही दिरंगाई करणार नाही याचा मी तुम्हाला विश्वास देतो. त्य भावना आम्ही पूर्ण करू आणि त्यासाठी मग लडाख असो, श्रीनगर असो, जम्मू असो प्रत्येक नागरिकाला आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ, सबका साथ सबका विकासाचा मंत्र घेऊन आम्ही समृद्ध काश्मीर, शांत काश्मीर, संपूर्ण भारताला आमंत्रण देणारा काश्मीर, निसर्गरम्य खोऱ्यांमधील समृद्ध काश्मीर या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलू.

आमचे इथले प्रत्येक कुटुंब, इथले प्रत्येक मुलं त्यांचे उज्वल भविष्य, भारताच्या  उज्ज्वल भविष्याशी याचा खरा खुरा संबंध आहे. या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करत राहू. याच विश्वासासह मी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

धन्यवाद...

B.Gokhale/N.Chitale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  

 

 

 

 

 



(Release ID: 1563374) Visitor Counter : 182


Read this release in: English