मंत्रिमंडळ

शांततापूर्ण वापरासाठी बाह्य अवकाशाचा वापर आणि शोध यामधील सहकार्याबाबत भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील रूपरेखा कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  शांततापूर्ण वापरासाठी बाह्य अवकाशाचा वापर आणि शोध यामधील सहकार्याबाबत भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील रूपरेखा कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 30 मे 2018 रोजी जकार्ता येथे स्वाक्षऱ्या आणि आदानप्रदान करण्यात आले होते. .

तपशील:-

हा रूपरेखा करार अंतराळ विज्ञान, बाह्य अंतरिक्षचा शोध आणि वापर ,पृथ्वीचे रिमोट सेन्सिंग , एकात्मिक बीआयएके टीटीसी केंद्राचे  परिचालन आणि देखभाल यासारख्या संभाव्य हिताच्या क्षेत्रात सहकार्य दृढ करेल.

करारामुळे विशिष्ट प्रक्रियांच्या अंमलबजावणीला अंतिम स्वरूप देता येईल. या करारातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल. यामध्ये अंतराळ विभाग/इस्रो, इंडोनेशियन नेशनल इन्स्टीट्युट ऑफ एरोनॉटिक्स अँड स्पेस (एलएपीएएन) च्या सदस्यांचा समावेश असेल.

व्यापक प्रभाव:

रूपरेखा करारामुळे उभय देशांदरम्यान सहकार्य मजबूत होईल. या करारामुळे इंडोनेशियामध्ये इस्रोचे टीटीसी केंद्र आणि आयआरएमएस केंद्र स्थापन करण्यात मदत होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563268) Visitor Counter : 46


Read this release in: English