मंत्रिमंडळ

जलपायगुडी येथे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी


चार जिल्ह्यांमधील अधिकार क्षेत्र - दार्जिलिंग, कालिंपोंग , जलपायगुडी आणि कुच बिहार

Posted On: 06 FEB 2019 11:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जलपायगुडी येथे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. दार्जिलिंग, कालिंपोंग , जलपायगुडी आणि कूच बिहार या चार जिल्ह्यांत त्याचे अधिकार क्षेत्र असेल.

1988 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीतील तसेच 16-06-2006 रोजी मंत्रिमंडळ निर्णयाच्या  पार्श्वभूमीवर  जलपायगुडी येथे  कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना करायला आणि न्यायाधीशांच्या पथकाने जलपायगुडी  येथील सर्किट बेंचच्या प्रस्तावित जागेला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घ्यायला मंजुरी दिली.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1563266) Visitor Counter : 75


Read this release in: English