मंत्रिमंडळ

भारत आणि नॉर्वे दरम्यान भारत-नॉर्वे महासागर संवादावरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि नॉर्वे दरम्यान भारत-नॉर्वे महासागर संवादावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

लाभ :

     या करारामुळे महासागरीय अर्थव्‍यवस्थेच्या विकासाशी संबंधित परस्‍पर हिताच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. महासागरीय अर्थव्‍यवस्‍था क्षेत्रात नॉर्वे जगात अग्रस्थानी आहे. त्यांच्याकडे मासेपालन, हाइड्रोकार्बन, अक्षय ऊर्जा, सागरी संसाधन आणि सागरी वाहतूक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ आहेत. प्रस्तावित करारामुळे  संयुक्‍त कृतीदल कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधितांच्या परस्‍पर लाभासाठी हाइड्रोकार्बन आणि अन्य सागरी संसाधनासह बंदर व्यवस्थापन आणि पर्यटन विकास सारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण करण्यात मदत मिळेल. मासेपालन आणि जलचर संस्कृती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करून अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563134) Visitor Counter : 89


Read this release in: English