वस्त्रोद्योग मंत्रालय

वर्डर्स काऊंट महोत्सव 2019 उत्साहात साजरा


पहिला वर्डस्मिथ पुरस्कार पवन कुमार वर्मा यांना प्रदान

33 टक्के महिला आरक्षणासाठी प्रयत्न – इराणी

प्रविष्टि तिथि: 04 FEB 2019 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2019

 

पुरस्कार विजेत्या लेखिका अद्विता काला यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वर्ड काऊंट महोत्सव 2019 पुण्यात नुकताच पार पडला. सामाजिक-राजकीय क्षेत्रातील वक्त्यांनी यावेळी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी, खासदार असा दुदिन ओवेसी यावेळी उपस्थित होते. देशात महिला शक्ती विकसित करण्यासाठी महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक उपयुक्त ठरेल, असे मत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. यावेळी स्टार ते स्टार प्रचारक हा आपला प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.

प्रसिद्ध लेखक पवनकुमार वर्मा यांना साहित्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल पहिला वर्डस्मिथ पुरस्कार देण्यात आला.

शिक्षणतज्ञ सुनील अंबेकर, लेखिका कविता काणे, डिंपल कौक, शेफाली वैद्य आदींनी आपली मते व्यक्त केली.

 

 

B.Gokhale/S.Kane/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1562750) आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English