पंतप्रधान कार्यालय

वर्ष 2019 -20 चे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 01 FEB 2019 6:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2019

 

भारताला बळकट राष्ट्र बनवण्यासाठी विविध लोकोपयोगी योजनांचा समावेशासह उचललें एक महत्त्वाचे पाऊल.

वर्ष 2019 - 20  अर्थसंकल्पातशेतकरी  कल्याण ते मध्यमवर्गीयांपर्यंत, आयकर सूट ते पायाभूत सुविधांपर्यंत, निर्मिती  ते आरोग्य अशा विविध क्षेत्रांची काळजी  आणि  विचार  या अर्थसंकल्पात केला असून नवीन भारत बनवण्यासाठी विकासाची महत्त्वाची पायरी याद्वारे चढल्या गेली  आहे.

मित्रांनो सरकारने विविध योजना चालू केल्यानंतर या योजनांचा परिणाम भारताच्या प्रत्येक स्वतंत्र नागरिकांवर सकारात्मकरीत्या झाला आहे आयुष्यमान भारत योजना जवळपास पन्नास कोटी गरीब लोकांना फायदा मिळवून देणारी आहे.  21 कोटी लोक प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत आले आहेत. स्वच्छ भारत मिशन द्वारे 9 कोटी कुटुंबीयांना लाभ मिळाला आहे.  सहा कोटी कुटुंबांना विनामूल्य गॅस जोडणी उज्वला प्रकल्पांतर्गत देण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1.5 कोटी  लोक आणि त्यांच्या  कुटुंबीयांना  स्वतःच्या  मालकीचे घर  देण्यात आले आहेत

आता या अंदाजपत्रकात 12 कोटींपेक्षा जास्त शेतकऱी, तीन कोटी मध्यम वर्गीय कर दाते आणि 30 ते 40 कोटी कामगार प्रत्यक्षपणे लाभदायी ठरणार आहेत.

मित्रांनो, सरकारने घेतलेल्या प्रयत्नांचे आभार ! ज्यामुळे दारिद्र्य निर्मूलन हे अति वेगवान पद्धतीने हाताळण्यात आले आणि या प्रयत्नांमुळेच आज दारिद्र्य दारिद्र्य रेषेखालील करोडो जनतेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळाली आहे, त्यांचे जीवनमान सुकर झाले आहे . आता त्यांची गणना मध्यमवर्गीय ते अति मध्यमवर्गीयांच्या समूहात होऊ शकते. हा मोठ्या प्रमाणावरील समूह त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्राच्या विकासात प्रेरणादायी ठरेल. सरकारने नेहमीच त्यांच्या आश्वासनानुसार उभरत्या मध्यम वर्गीयना त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पाठिंबा आणि  पंख दिले आहेत.

मी मध्यमवर्गीय आणि वेतन धारी मध्यमवर्गीयांचे त्यांना चालू अर्थसंकल्पात मिळालेल्या आयकर सुटसाठी अभिनंदन करतो. मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय प्रकारातील असे करदाते जे नियमांचे पालन करतात आणि  नियमित कर भरतात, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. हे करापासून मिळालेले उत्पन्न, विविध कल्याणकारी योजनांचा अंमलबजावणीसाठी आणि गरिबांच्या संवर्धनासाठी उपयोगी आणले जाते. पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्याना कुठल्याही प्रकारचा कर लागू नये अशी जी प्रलंबित मागणी होती ती आमच्या सरकारने यावर्षी पूर्ण केली आहे.

मित्रांनो, अनेक सरकारे अनेक शेतकर्‍यांविषयीच्या योजना घेऊन सत्तेमध्ये आलेततथापि दोन ते तीन कोटी शेतकरीच उच्च उत्पादन गटातील असले तरी मोठ्या प्रमाणावरील शेतकरी या वर्तुळापर्यंत पोहोचू शकत नाही आता पंतप्रधान किसान योजनेद्वारे पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किसान योजना निधीची मदत मिळणार आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध विकासात्मक पावले उचलली आहेत. पशूपालन, गाईचे कल्याण, मत्स्य व्यवसायासाठी वेगळा विभाग अशा पद्धतीने या क्षेत्रांची काळजी घेतल्या जात आहे , अशा या विभागामुळे करोडो शेतकऱ्यांना विकासाच्या सुवर्णसंधी मिळणार आहे. आमचे सर्वदूर प्रयत्न असतात की शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना यंत्रसामुग्रीची तरतूद व्हावी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी स्त्रोत मिळावे आजच्या अर्थसंकल्पातील निर्णय हे या अभियानाला प्रेरणा देते.

मित्रांनो भारताचा विविधांगी विकास होत आहे नवीन योजना येतात नवीन क्षेत्रांचा शोध लागतो आणि अनेक लोक या क्षेत्रांमध्ये कार्यरत होतात तथापि असंघटित क्षेत्रातील कामगार, घरगुती कामगार कृषी कामगार असा समाजातील मोठा वर्ग जो दुर्लक्षित आहे त्यांना आता स्वतःच्या कर्तुत्वावर दिशा मिळणार आहे देशात सध्या 40 ते 42 कोटी असंघटित कामगार आहे अशा कामगारांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर प्रधानमंत्री श्रम योजना मानधन योजना याद्वारे पाठिंबा देण्यात येईल ते केवळ आयुष्यमान भारत योजनेचा प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तर इतर कल्याणकारी योजना आणि त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी निवृत्ती वेतन सुद्धा त्यांना मिळू शकेल.

बंधू  आणि भगिनींनो आमचे सरकार शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे आम्ही मद्रसी, बंजारा, गडीलोहर अशा विविध भटक्या विमुक्त जमातींसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे मला खात्री आहे की, योग्य प्रकारचा प्रयत्नांमुळे विकासाचे लाभ या समुदायाला त्वरित मिळतील.

मित्रांनो, व्यापारी आणि व्यवसायिकांसाठी आम्ही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, डीआयपीपी ची पुनर्बांधणी करण्यात आली आहे आता हा विभाग उद्योगांना प्रोत्साहन आणि अंतर्गत सरकार या नावाने ओळखल्या जाईल.

पुन्हा एकदा मी अरुण जेटली आणि पियुष गोयल  यांनी उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1562504) Visitor Counter : 97


Read this release in: English