पंतप्रधान कार्यालय
स्मारकांच्या माध्यमातून राष्ट्रीय अस्मितेचा प्रसार
Posted On:
30 JAN 2019 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2019
31 ऑक्टोबर 2016 ला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान सुरू करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सरदार पटेल यांनी आम्हाला एक भारत दिला असून, आता 125 कोटी भारतीयांची श्रेष्ठ भारत बनविण्याची एकत्रित जबाबदारी आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्याआधीच त्यांची ही कल्पना मार्गदर्शित केली होती.
असे राष्ट्रीय ऐतिहासिक नेते ज्यांनी देशाच्या एकता, सुरक्षा, सार्वभौमत्वतेसाठी आपल्या प्राणांचा त्याग केला अशा नेत्यांचा सन्मान होणे गरजेचे असण्यावर नरेंद्र मोदींचा विश्वास आहे. त्यांनी आपला ‘इतिहास आणि वारसा’ आपली राष्ट्रीय चेतना आणि अभिमानाचा एक भाग असल्याचे सांगितले.
दांडी येथील ‘राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक’ हे एक उदाहरण आहे. महात्मा गांधी आणि त्यांच्या 80 सहकाऱ्यांनी 1930 च्या दांडी मार्चचे नेतृत्व केले होते त्या दांडी मार्च वेळी असणाऱ्या ऊर्जा आणि जोश यांचा गौरव करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
182 मीटर उंची असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ,चे वर्णन करणारे हे सर्वात उल्लेखनीय उदाहरण आहे. आज जो पुतळा उभा आहे त्या पाठीमागे, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जगातल्या सर्वात उंच मूर्तिची कल्पना केली होती. पुतळा केवळ भारताच्या आयर्न मॅनला समर्पित नाही तर ज्यांनी भारताला एकत्रित केले, अशा सर्व भारतीयांना समर्पित आहे .
दशकापासून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंब त्यांच्या आयुष्यातील कार्यक्रमांशी संबंधित फाइल्सची मागणी करत होते. निरंतर सरकारांनी ठोस निर्णय घेण्यास नकार दिला. परंतु ऑक्टोबर 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी नेताजींच्या कुटुंबाला आमंत्रित केले आणि फाईल्स देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले कि, इतिहासाची गळचेपी करण्यात मला तरी काही तथ्य दिसत नाही. जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करण्याची शक्ती देखील कमी करतात. फायली त्वरित उपलब्ध करून त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्यात.
1940 च्या दशकात लाल किल्ल्यातील भारतीय राष्ट्रीय सैन्य अर्थात आयएनए ट्रायल्सने राष्ट्रांना आकर्षित केले. तथापि, कित्येक दशके, ज्या इमारतींमध्ये या ट्रायल्स चालायच्या, त्या सर्व लाल किल्ला परिसरातच विसरल्या गेल्यात. सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीवर्षी, त्याच इमारतीत नेताजी आणि भारतीय राष्ट्रीय सैन्याला समर्पित असलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. एकूण संग्रहालयाचा परिसर हा चार विभागात विभागून त्याला "क्रांती मंदिर" नांव देण्यात आले आहे. 1857 चा उठाव आणि जालीयनवालाबाग नरसंहार यांना समर्पित संग्रहालये देखील या संकुलाचा एक भाग आहेत.
आपत्ती प्रतिसाद ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर एक पुरस्कार जाहीर केला आहे.
गेल्या चार वर्षांत, इतिहासातल्या अनेक महान नेत्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी अनेक स्मारकांची निर्मिती करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख कल्पनांपैकी एक पंचतीर्थ-बाबासाहेब भीमराव अंबेडकरांना समर्पित पाच स्मारकांचा समावेश आहे. यात लंडनमधील माहू येथील जन्मस्थळ, नागपूरमधील शिक्षण घेताना, दिल्लीतील महापारिवर्तन स्थान आणि मुंबईतील चैत्य भुमी येथील राहण्याचे ठिकाण होते.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कच्छ मधील श्यामजी कृष्णा वर्मा यांना समर्पित स्मारकांचे उद्घाटन केले.
हरियाणामध्ये, त्यांनी एक महान सामाजिक सुधारक सर छोटू राम यांची प्रतिमा प्रकाशित केली.
त्यांनी मुंबईच्या अरबी समुद्रावरील किनाऱ्यावर शिवाजीस्मारकाची कोनशिला ठेवली.
दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये पंतप्रधानांनी सरदार पटेल गॅलरीचे उद्घाटन केले.
अलीकडेच त्यांनी देशाच्या सेवेसाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या 33,000 पोलिस कर्मचार्यांच्या धैर्य व बलिदानास सलामी देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारक राष्ट्राला समर्पित केले.
काही आठवड्यांच्या आत, राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे देखील अनावरण केले जाईल, हे असे युद्धस्मारक राहील तिथे स्वातंत्र्यानंतर युद्ध आणि ऑपरेशनमध्ये जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या स्मृती असतील.
स्मारकविधी म्हणजे बलिदानांचे स्मरणपत्र आहे, ज्यांचे योगदान आता आपल्याला चांगले जीवन जगण्यास सक्षम करते. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते प्रेरणास्थान आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बांधलेले हे स्मारक राष्ट्रीयत्वाची, एकतेची आणि अभिमानाची भावना निर्माण करतात, ज्यांचे पालनपोषण आवश्यक आहे.
B.Gokhale/P.Malandkar
(Release ID: 1562072)
Visitor Counter : 124