अर्थ मंत्रालय

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

Posted On: 24 JAN 2019 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2019

 

स्वत:चा जीव धोक्यात घालून देशसेवेसाठी अतुलनीय काम करणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दरवर्षी राष्ट्रपती पुरस्काराने गौरवले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज अशा 46 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जीव धेाक्यात घालून केलेल्या अतुलनीय सेवेसाठी तीन अधिकाऱ्यांना अतुलनीय सेवा पुरस्कार दिला जाणार आहे. तर, विशेष काम करणाऱ्या 43 अधिकाऱ्यांना विशेष सेवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारात जम्मूचे दोन वरीष्ठ अधिकारी, ऐझवालच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

43 विशेष सेवा पुरस्कारांमधे मुंबईचे सीमा शुल्क आयुक्त सुभाष अग्रवाल, सीमा शुल्क विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश ढवळे, डीआरआय क्षेत्रीय विभागाचे उपसंचालक सतीश पट्टापू, जीएसटी विभागाचे अधिक्षक हरीश परेचा, गुप्तचर विभागाचे विनोद पिशरोडे, पुण्याचे गुप्तचर विभागाचे अधिकारी सृष्टी रामेश्वर बाबा या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

S.Tupe/R.Aghor/D. Rane

 


(Release ID: 1561303)
Read this release in: English