वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य मंत्रालयाने सेझ धोरणाबाबत बाबा कल्याणी गट अहवालावर मागवल्या सूचना
Posted On:
22 JAN 2019 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2019
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाने भारतातील सेझ धोरणाचा अभ्यास करण्याकरीता जून 2018 मध्ये ‘मे. भारत फोर्ज लिमिटेडचे’ प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली सेझ संबंधितांचा गट स्थापन केला होता. विचार विनिमयानंतर तयार केलेला अहवाल गटाने सादर केला आहे. त्यावरील सूचना / टिपण्णीकरीता अहवालाची प्रत ‘SEZindia.nic.in’ या संकेतस्थळावर आहे. सूचना 30 जानेवारी 2019 पर्यंत moc_epz[at]nic[dot]in या मेल आयडीवर पाठवाव्यात.
B.Gokhale/S.Kakade/D. Rane
(Release ID: 1560912)