पंतप्रधान कार्यालय

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नव्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्‌घाटन

Posted On: 18 JAN 2019 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नव्या इमारतीचे 19 जानेवारीला उद्‌घाटन करणार आहेत. राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देऊन ते उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय चित्रपटांच्या झळाळत्या इतिहासाचे दर्शन घडविण्याबरोबरच देशाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास चिपटांच्या माध्यमातून या संग्रहालयात उलगडला जाणार आहे. दृश्य, ग्राफीक्स, चित्रपट विषयक कात्रणे, प्रसिद्धीपर साहित्य यासह इतर माध्यमातून कथकथनाद्वारे चित्रपटांचा हा प्रवास अनुभवता येणार आहे.

दक्षिण मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमधल्या ऐतिहासिक गुलशन महल आणि नवी संग्रहालय इमारत या दोन इमारतीत हे संग्रहालय आहे.

नव्या संग्रहालय इमारतीत चार विभाग असून एकात गांधी आणि चित्रपट, दुसऱ्‍यात बाल चित्रपट स्टुडिओ, तिसऱ्यात तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि भारतीय चित्रपट, तर चौथा भारतातले चित्रपट विभाग आहे. नव्या संग्रहालय इमारतीत डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर आणि 7.1 सराऊंड ध्वनी यंत्रणेने सुसज्ज दोन प्रेक्षागृहंही आहेत.

 

 

N.Sapre/N. Chitale/D. Rane

 

 



(Release ID: 1560592) Visitor Counter : 73


Read this release in: English