पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2019 साठी गुजरातला भेट देणार


गांधी नगर येथे व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार परिषदेचे उद्‌घाटन करणार
अहमदाबाद येथे अत्याधुनिक सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय विज्ञान संस्थेचे उद्‌घाटन करणार
पंतप्रधान अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल 2019 चे उद्या उद्‌घाटन करणार
18 जानेवारी रोजी नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन
19 जानेवारी रोजी पंतप्रधान हजीरा, सिल्वासा आणि मुंबईला भेट देणार

Posted On: 16 JAN 2019 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 17 जानेवारी 2019 रोजी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गांधीनगर, अहमदाबाद आणि हजीराला भेट देणार आहेत.

उद्या होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमात गांधीनगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्‌घाटन करतील. या प्रदर्शनात 25 हून अधिक औद्योगिक आणि व्यापार क्षेत्र एकाच छताखाली उपलब्ध असतील.

संध्याकाळी ते अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करतील. अहमदाबाद महानगरपालिकेने हे अत्याधुनिक अतिविशिष्ट सरकारी रुग्णालय बांधले आहे. यामध्ये आधुनिक सुविधा तसेच एअर ॲम्ब्युलन्सचा समावेश आहे. 78 मीटर उंच ही इमारत असून कौशल्य, व्याप्ती आणि वेग यांचे खरे मिश्रण आहे. डिजिटल भारताच्या अनुषंगाने हे रुग्णालय पूर्णपणे कागदरहीत असेल. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत हे रुग्णालय सामान्य माणसाच्या सेवेसाठी उपलब्ध असेल.

पंतप्रधान या रुग्णालयातील सुविधांची पाहणी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

त्यानंतर संध्याकाळी उशीरा पंतप्रधान अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल 2019 चे उद्‌घाटन करतील. व्हायब्रंट गुजरातच्या बरोबरीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान व्हायब्रंट गुजरात अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलच्या मॅसकॉटचे उद्‌घाटन करतील. अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवल हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच महोत्सव आहे. शहरातील उद्योगांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी यामुळे संधी मिळेल. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान गांधी नगर येथे महात्मा मंदीर प्रदर्शन केंद्रात नवव्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे उद्‌घाटन करतील. 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातला पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनवण्यासाठी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमुळे जागतिक, सामाजिक, आर्थिक विकास, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि उपयुक्त भागीदारी करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. 19 जानेवारी 2019 रोजी हजीरा बंदूक कारखान्याच्या स्थापनेसाठी पंतप्रधान हजीराला भेट देतील.

हजीरा येथून पंतप्रधान दादरा-नगर हवेली मधील सिल्वासाला भेट देतील. तिथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील.

आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान 19 जानेवारी रोजी मुंबईला भेट देतील. भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होईल.  

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1560305) Visitor Counter : 81


Read this release in: English