मंत्रिमंडळ

1 जानेवारी 97 पासून एनएचपीसी, नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, टीएचडीसी इंडिया, एसजेव्हीएनच्या मंडळ स्तर कार्यकारी स्तराच्या खालील वेतनमान नियमिततेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 JAN 2019 6:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2019

 

1 जानेवारी 97 पासून एनएचपीसी अर्थात राष्ट्रीय जल विद्युत महामंडळ, नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, टीएचडीसी इंडिया (पूर्वीचे टेहरी जल विकास महामंडळ), सतलज जल विद्युत निगम अर्थात एसजेव्हीएनच्या मंडळ स्तर कार्यकारी स्तराच्या खालील वेतनमान नियमिततेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विद्युत मंत्रालयाच्या 4-4-2006 आणि 1-9-2006 च्या आदेशानुसार  हे लागू करण्यात आले होते.

 

अंमलबजावणी धोरण

मंजुरीमुळे, विद्युत मंत्रालयाच्या  4-4-2006 आणि 1-9-2006 च्या आदेशानुसार  जलविद्युत क्षेत्रातल्या  केंद्रीय सार्वजनिक उद्योगांद्वारा लागू करण्यात आलेले वेतनमान नियमित केले जाईल.

 

प्रभाव

यामुळे,जलविद्युत क्षेत्रातल्या सार्वजनिक उद्योगात 1-1 2007  पूर्वी दाखल झालेल्या  5224 कार्यकारीना याचा लाभ होणार आहे. यामुळे जलविद्युत क्षेत्रातल्या सार्वजनिक उद्योगातल्या कार्यकारीना  प्रोत्साहन मिळणार आहे.

 

व्यय

वेतनमान नियमिततेसाठी सुमारे 323 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 

पूर्वपीठीका

एनटीपीसी/ तेल क्षेत्रानुसार कामगार आणि बिगर कार्यकारी यांच्या केंद्रीय कृत श्रेणीच्या वेतनमानात सुधारणा केल्याने 01.01.1997  पासून एनएचपीसी,नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन,टीएचडीसी इंडिया,एसजेव्हीएनच्या कार्यकारींच्या वेतनमानात विषमता होती.कामगार आणि पर्यवेक्षक यांचे वेतन ई 1 श्रेणीच्या कार्यकारी पेक्षा अधिक होते.   मंत्रिमंडळ आणि सचिव समितीने याधीही या प्रस्तावावर विचार केला होता.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1560180) Visitor Counter : 89


Read this release in: English