मंत्रिमंडळ

एक्झिम बँकेच्या पुनर्भांडवलीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 JAN 2019 5:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक्झिम  बँकेच्या पुनर्भांडवलीकरणाला मंजुरी देण्यात आली.याचा तपशील याप्रमाणे –

  1. एक्झिम  अर्थात भारतीय आयात निर्यात बँकेच्या पुनर्भांडवलीकरणासाठी केंद्र सरकार,6000 कोटी रुपयांचे पुनर्भांडवलीकरण रोखे जारी करणार
  2. 2018- 19 या वित्तीय वर्षात 4500 कोटी तर 2019 -20 या वित्तीय वर्षात 1500 कोटी अशा दोन टप्प्यात भांडवल घातले जाईल.
  3. एक्झिम  बँकेचे भांडवल 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवायलाही मंत्री मंडळाने मंजुरी दिली.

 

ठळक प्रभाव

  • एक्झिम बँक ही भारताची प्रमुख निर्यात पत एजन्सी आहे.
  • एक्झिम बँकेतील भांडवल सहयोगामुळे भांडवल वृद्धी पुरेशी राहील आणि भारतीय निर्यातीला अधिक क्षमतेने सहयोग राहील. 
  • भांडवल सहयोगामुळे भारतीय वस्त्रोद्योगाला आवश्यक सहाय्यता देणे, सवलती वित्त योजना (सीएफएस) मधले संभाव्य बदल यासारख्या नव्या उपक्रमांना चालना मिळणार आहे.

 

पूर्वपीठीका

एक्झिम बँकेची निर्मिती 1982 या वर्षी झाली. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी, वित्तीय पाठबळ देणारी सर्वोच्च संस्था म्हणून या बँकेची निर्मिती करण्यात आली. एक्झिम बँकेचे नियमन रिझर्व बँकेकडून केले जाते. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1560155) Visitor Counter : 115


Read this release in: English