मंत्रिमंडळ

खाणींमधील सुरक्षा तसेच संशोधन व परिक्षण केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 JAN 2019 5:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खाणींमधील सुरक्षा तसेच संशोधन व परिक्षण केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सामंजस्य कराराला मंजुरी दिली. हा सामंजस्य करार खाण सुरक्षा महासंचालक, कामगार आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार आणि खाण व ऊर्जा नैसर्गिक स्रोत विभाग, क्वीन्सलॅण्ड सरकार ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान करण्यात आला.

 

प्रभाव/परिणाम

या सामंजस्य करारामुळे डीजीएमएस आणि एसआयएमटीएआरएस यांच्या दरम्यान भागीदारी प्रस्थापित होणार आहे.

  • जोखीम आधारित सुरक्षा व्यवस्थापन पद्धतीची अंमलबजावणी, प्रशिक्षण इ.
  • परिषद, कार्यशाळा, सेमिनार्स आणि इतर तांत्रिक बैठकींचे आयोजन व संघटन तसेच प्रबोधिनीचे आरोग्य आणि राष्ट्रीय खाण आपत्ती केंद्रांची स्थापना
  • डीजीएमएस येथे संशोधन आणि विकास प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करण्यात येईल.

 

अंमलबजावणी धोरण

हा सामंजस्य करार, स्वाक्षऱ्या झाल्या तारखेपासून लागू होऊन कराराचा कालावधी तीन वर्षांचा असेल.

 

पूर्वपिठीका

जागतिक पातळीवर ऑस्ट्रेलियातील खाण अपघातांचा दर सर्वात कमी आहे. ऑस्ट्रेलियाचे जोखीम आधारित खाण क्षेत्र, ‘सुरक्षा व्यवस्थापन नियोजन’ हे संकल्पनाधारित तसेच जोखीम शोधून काढण्यासाठी ते नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करतात.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1560152) Visitor Counter : 96


Read this release in: English