पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या केरळला भेट देणार


राष्ट्रीय महामार्ग-66 वरील कोल्लम बायपासचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन
तिरुअनंतपूरम्‌ येथील पद्मनाभ स्वामी मंदिराला पंतप्रधान भेट देणार

Posted On: 14 JAN 2019 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केरळमधील कोल्लम आणि तिरुअनंतपूरम्‌ला भेट देणार आहेत.

कोल्लम येथे पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-66 वरील कोल्लम बायपासचे उद्‌घाटन करतील. हा 13 किमी लांब दुपदरी बायपास असून यासाठी 352 कोटी रुपये खर्च आला आहे. यामध्ये अष्टमुदी तलावावरील तीन प्रमुख पुलांचा समावेश असून त्याची लांबी 1540 मीटर आहे. या प्रकल्पामुळे अलाप्पुझा आणि तिरुअनंतपुरम् दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच कोल्लम शहरातली वाहतूक कोंडी कमी होईल.

तिरुअनंतपूरम्‌ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मनाभ स्वामी मंदिराला भेट देतील. तेथे अभ्यागतांसाठी उभारण्यात येणारे सुविधांच्या शुभारंभानिमित्त ते एका पट्टिकेचे अनावरण करण्याची शक्यता आहे.

कोल्लमचा पंतप्रधानांचा हा तिसरा अधिकृत दौरा आहे. डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी कोल्लमला प्रथम भेट दिली होती तेंव्हा त्यांनी आर. शंकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर एप्रिल 2016 मध्ये आगीची दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधानांनी कोल्लमला भेट दिली होती.  

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1559913) Visitor Counter : 67


Read this release in: English