पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या वहिल्या फिलिप कोटलर पुरस्काराने सन्मानित

Posted On: 14 JAN 2019 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सात लोककल्याण मार्ग नवी दिल्ली येथे पहिल्या वहिल्या फिलीप कोटलर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार ‘पीपल, प्रॉफीट आणि प्लॅनेट’ या तिहेरी टॅगलाईन वर प्रकाश टाकतो. हा  पुरस्कार दरवर्षी राष्ट्रप्रमुखांना देण्यात येईल.  

पुरस्कार उद्धरणात असे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांची निवड त्यांनी  राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे दिलेल्या त्यांच्या अतिउत्कृष्ट योगदानासाठी झाली आहे. त्यांची भारताप्रती निरंतर सेवा, अविश्रांत कार्यपद्धतीमुळे देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक सेवांमध्ये वाढ झाली आहे.

उद्धरणात पुढे म्हटले आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची ओळख मूल्याधारित निर्मिती (मेक इन इंडिया) आणि नाविन्यता यासाठी झाली आहे. तसेच माहिती, तंत्रज्ञान, वित्त आणि लेखा या सेवांमध्ये जागतिक स्तरावर व्यावसायिक सेवा देणारे केंद्र म्हणूनही मान्यता मिळाली आहे.

उद्धरणामधे असेही नमूद केले आहे की, त्यांचे दृष्टीकोनात्मक नेतृत्व देशाच्या डिजिटल उत्क्रांतीसाठी उपयोगी ठरले आहे. ज्यामधे युआयएन, आधार यांचा समावेश सामाजिक हितासाठी आणि आर्थिक समावेशतेसाठी करण्यात आला आहे. व्यवसाय सुलभता, 21 व्या शतकात भारतासाठी पायाभूत सेवांची निर्मिती आणि उद्योजकता यांना यामुळे वाव मिळत आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ यासाठी दिलेल्या प्राधान्यामुळे आज भारताची जागतिक स्तरावर निर्मिती आणि व्यवसायिक हब म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे.

प्राध्यापक फिलीप कोटलर हे केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थ वेस्टन युनिर्व्हसिटी येथे विपणनाचे जागतिक दर्जाचे प्राध्यापक आहेत परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांची पुरस्कार स्वीकारण्याची जबाबदारी अमेरिकेच्या जॉर्जिया येथील इमॉरी  विद्यापीठाचे डॉ. जगदीश सेठ यांना सोपविण्यात आली होती.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1559871) Visitor Counter : 170


Read this release in: English